बारामतीत कोरोनाचा कहर, शासकीय कार्यालयात जाण्याअगोदर नागरिकांनी काळजी घ्यावी... बारामती:-कालचे शासकीय (26/02/21) एकूण rt-pcr नमुने 176. एकूण पॉझिटिव्ह-22. प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -02. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -24 त्यापैकी पॉझिटिव्ह -06. कालचे एकूण एंटीजन 31. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-08.काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 22+06+08=36. शहर-24. ग्रामीण- 12. एकूण रूग्णसंख्या-6742 एकूण बरे झालेले रुग्ण- 6315 एकूण मृत्यू-- 146.
बारामती तालुक्यात सातत्याने कोरोनाचे रुग्ण
वाढत असून लोकांच्या संपर्कात आलेल्या
शासकीय अधिकार्यांना देखील कोरोनाचा झटका
बसला आहे. बारामती तालुक्यात काल पोलीस
अधिकारी व महसूल अधिकार्यांना देखील
कोरोनाची लागण झाली असून शासकीय कार्यालयात कामासाठी जाणार्या नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.बारामती तालुक्यात काल झालेल्या शासकीय आरटीपीसीआर
तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये तांदूळवाडी येथील 34 वर्षीय पुरुष, मुढाळे येथील 55 वर्षे पुरुष, सस्तेवाडी येथील चाळीस वर्षीय पुरुष, शारदा नगर येथील 40 वर्षीय महिला, कांबळेश्वर येथील 82 वर्षीय
पुरुष, उत्कर्ष नगर येथील 18 वर्षीय युवक, खत्री
इस्टेट येथील तीस वर्षीय पुरुष, वडगाव निंबाळकर येथील 36 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.वसंतनगर येथील 27 वर्षीय पुरुष, वझरे येथील 33 वर्षीय पुरुष, रामगल्ली येथील 58 वर्षीय पुरुष,आमराई येथील 83 वर्षीय महिला, तांदूळवाडी येथील 16 वर्षीय युवक, गुणवडी येथील 45 वर्षीय महिला, पुरुष येथील 19 वर्षीय पुरुष, खंडोबानगर येथील 23 वर्षीय महिला, जळोची येथील 60 वर्षीय महिला, 30 वर्षीय महिला, सहयोग सोसायटी येथील 47 वर्षीय पुरुष, श्रीरामनगर येथील 21 वर्षीय पुरुष, शिरवली येथील 27 वर्षीय महिला, सूर्यनगरी येथील 38 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.बारामतीत काल मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या रॅपिड अँटीजेन तपासणीत
आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये देसाई इस्टेट येथील 27 वर्षीय पुरुष, खंडोबानगर वाबळे वाडा येथील 44 वर्षीय पुरुष, भगत हॉस्पिटल बुरुड गल्ली शेजारी 72 वर्षीय महिला, खत्री इस्टेट येथील 31 वर्षीय पुरुष,टाटिया इस्टेट पाटस रोड येथील 56 वर्षीय पुरुष,तांदुळवाडी वेस शेजारी 28 वर्षे पुरुष, अशोकनगर येथील 48 वर्षीय महिला, शारदा रेसिडेन्सी येथील 24 वर्षीय पुरुष, शासकीय अधिकारी निवास बारामती येथील 43 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.पणदरे जगताप वस्ती येथील 56 वर्षीय पुरुष,चोपडज येथील 13 वर्षीय मुलगी, अवधूत हाउसिंग सोसायटी तपोवन कॉलनी येथील 50 वर्षीय महिला, 52 वर्षीय पुरुष, पार्थ सावली अपार्टमेंट रुई येथील 44 वर्षीय पुरुष, कसबा येथील 26 वर्षीय
पुरुष, माळेगाव येथील 67 वर्षीय पुरुष व 50 वर्षीय महिला कोरोनाबाधित आढळून आले आहेत, सूर्यनगरी येथील 39 वर्षीय पुरुष, गुणवडी रोड येथील 41 वर्षीय महिला, मॅजिक ग्रीन सीटी येथील 35 वर्षीय पुरुष कोरोना बाधित आढळून आले आसल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी माहिती दिली.
No comments:
Post a Comment