महामानवांच्या नावांची होत असलेली विटंबना थांबवावी अन्यथा शिवधर्म फाउंडेशन हिंदुस्थान संघटनेच्या वतीने करणार आंदोलन....
बारामती:-संभाजी महाराज व इतर सत्यशोधक महापुरुषांचे नाव समाविष्ट करणे बाबत या
विषयाचे निवेदन तहसीलदार बारामती यांना सादर करण्यात आले,, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज है अखंड महाराष्ट्राचे आद्य पुरुष आहेत. त्यांची ख्याती जगविख्यात आहे. संभाजी महाराज हे फक्त योद्धेचं नाही तर महाराष्ट्र राज्याचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे वारसदार आहेत तसेच एक उत्कृष्ट लेखक देखील होते. अशा प्रेरणादायी कारकीर्दच्या महामानवाचे धूमपान करण्याचे एक साधन असलेली बिडी यास नाव देऊन साबळे वाघिरे आणि कंपनीचे मालक हे महाशय तमाम महाराष्ट्रातील युवकांना आकर्षित करुन आपला व्यवसाय वाढवीत होते परंतु शिवधर्म फाउंडेशन हिंदुस्यान या आमच्या संघटनेमार्फत आम्ही महाराष्ट्र राज्या मध्ये मोठे आंदोलन उभे केले आणि या महाशयास बीडी वरील महाराजांचे नाव काढण्यास भाग पाडले तसेच अनेक वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज लहू फुले-शाहू-
आंबेड़कर अण्णाभाऊ साठे यांच्या पुरोगामी महाराष्ट्र मध्ये आजही अनेक महामानवांच्या कार्याला उजळा देऊन देशातील अनेक
इतिहासकार नव युवा वर्गामध्ये महामानवांच्या इतिहासाने प्रेरणा मिळावी यासाठी प्रयत्न करत असतात परंतु आज आपल्या पुरोगामी महाराष्ट्र मध्ये अनेक आशा महामानवांच्या नावांचा दुरुपयोग करत काही महाशय ( बिअर शॉपी, हॉटेल,लॉज,)पान शॉप पान शॉप म्हणून यामध्ये अवैद्य गुटखा गांजा दारू विक्री केली जाते आशा व्यवसायांना नाव देऊन छत्रपती संभाजी महाराज
बरोबरच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, अहिल्यादेवी होळकर, क्रांतिवीर राजे उमाजी नाईक, आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे,यासह इतर महामानवांचे नाव वापरून मोठ्या प्रमाणामध्ये व्यवसाय करतात याठिकाणी जाणीवपूर्वक महामानवांचे नावाची विटंबना केली जाते तरी आपण छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचे व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे,अहिल्यादेवी होळकर,क्रांतिवीर राजे उमाजी नाईक,आद्य क्रांतिगुरू लहजी वस्ताद साळवे यासह इतर महामानवांचे नाव करून घेण्यात यावे आणि महामानवांच्या नावांची होत असलेली विटंबना थांबवावी अन्यथा शिवधर्म फाउंडेशन हिंदुस्थान या संघटनेच्यावतीने आम्ही देशभरामध्ये तीव्र आंदोलन उभारू याची नोंद घ्यावीअसे निवेदन संस्थापक अध्यक्ष मा. दिपक आण्णा सिताराम काटे व इतर पदाधिकारी यांनी दिले.
No comments:
Post a Comment