बारामतीत चार सावकाराविरोधात पाच लाख रुपयांच्या रकमेच्या बदल्यात १० लाख व्याजासह १५ लाख रुपये दिल्यानंतरही लिहून घेतलेली दोन एकर जमीन पलटून न देणाऱ्यावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल...
बारामती:-सावकारी काही संपेना याच्या रोज काहींना काही घटना पुढे येत आहे याबाबत नुकताच पाच लाख मुद्दल रकमेच्या बदल्यात १० लाख व्याजासह १५ लाख रुपये दिल्यानंतरही लिहून घेतलेली दोन
एकर जमीन पलटून न देणाऱ्या चार सावकारांविरोधात बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भास्कर काशिनाथ वणवे, दत्तात्रय राजाराम वणवे (दोन्ही रा. लाकडी, ता. इंदापूर, जि. पुणे),महादेव उर्फ बिट्ट जालींदर सांगळे व मनोज विष्णू सांगळे (दोन्ही रा. जळोची, ता.बारामती) अशी आरोपींची नावे आहेत. बापू श्रीरंग वणवे(रा. लाकडी) यांनी याबाबत फिर्याद दिली. सन २०१५ पासून ही घटना घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.अधिक माहितीनुसार,
२०१५ मध्ये फिर्यादीला मुलीच्या लग्नासाठी पैशांची गरज होती. त्या वेळी भास्कर व दत्तात्रय वणवे या भावकीतील दोघांना त्यांनी अडचण सांगितली. त्यांनी बिट्ू सांगळे यांच्याकडून पैसे घेऊन देतो, व्याज द्यावे लागेल, असे सांगितले.त्यानुसार सांगळे यांनी फिर्यादीला ५ लाख रुपये दिले. त्यापोटी फिर्यादीकडून तीन कोरे चेक घेण्यात आले. ऑगस्ट २०१५ पर्यंत फिर्यादीने व्याजापोटी ९० हजार रुपये दिले. परंतु, त्यानंतर आरोपींनी सुरक्षेच्या कारणास्तव १७ ऑगस्ट २०१५ रोजी लाकडी येथील फिर्यादीची एक एकर जमीन
खुशखरेदी म्हणून लिहून घेतली. त्यानंतर पुन्हा
काही कालावधीनंतर आणखी एक एकर जमीन
लिहून घेण्यात आली. २०१९ मध्ये भास्कर वणवे यांनी फिर्यादीच्या दुचाकीचे आर सी बुक नेले.पाच लाखांच्या बदल्यात १० लाखांच्या
व्याजासह आजवर १५ लाख रुपये दिले असतानाही जमीन पलटवून दिला नाही. २२ ऑक्टोबर २०२० रोजी ही जमीन आरोपींनी विकली. त्यानंतर या जमिनीचा ताबा संबंधिताला द्यावा यासाठी ३० ऑक्टोबर २०२० रोजी आरोपींनी घरी येत शिवीगाळ, दमदाटी करत जिवंत सोडणार नाही,अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.अश्या अनेक घटना बारामती व आजूबाजूच्या परिसरात घडत आहे, काही पीडित लोक पुढे येत आहे तर काही जणांना दबाव टाकला जात असल्याचे सांगण्यात आले, याबाबत लवकरच अश्या काही सावकारकी करणाऱ्या पुढारी व गावगुंडाचा पर्दापाश् करणार असून पीडितांना न्याय देणार असल्याचे सांगितले.
No comments:
Post a Comment