S.T बस सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी सम्यक विद्यार्थी आंदोलन च्या वतीने बारामती आगर व्यवस्थापकांना निवेदन
बारामती:-सम्यक विद्यार्थी आंदोलन बारामती च्या वतीने तालुक्यातील बंद असलेल्या सर्वच गावांतील ST बस सेवा सुरू करण्यासाठी आणि
ITI मधील परीक्षा व निकाल लागेपर्यंत शिकाऊ प्रशिक्षणार्थी(Apratis) भरती थांबवणे बाबत प्रांत अधिकारी/तहसिलदार तसेच बारामती आगर व्यवस्थापक यांना निवेदन देण्यात आले.
Lockdown मुळे सर्वच गावांतील S.T बस सेवा पुर्णपणे बंद करण्यात आलेली होती. Lockdown शिथिल झाल्यानंतर बऱ्याच गावांतील बस सेवा सुरू करण्यात आलेली आहे परंतु बऱ्याच गावांतील बस सेवा अजुन देखील सुरू झालेली नाही त्यामुळे शाळा तसेच महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असल्याचे निदर्शनास येत आहे. खाजगी वाहन चालकांकडून आकारण्यात येणारे ज्यादाचे पैसे त्यात नागरिकांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवण्यात यावी यासाठी हे निवेदन सादर केले. तसेच २३ मार्च २०२० पूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी S.T चा पास काढलेला होता परंतु Lockdown मुळे त्यांना त्या पासचा पुर्णपणे वापर करण्यात आलेला नाही अश्या सर्व विद्यार्थ्यांना नुकसान भरपाई म्हणून त्यांना त्यांचे पैसे परत करण्यात यावेत अथवा त्यांच्या पासाची मुदत वाढविण्यात यावी असेही निवेदनात नमुद करण्यात आले.
तसेच सण २०१८ ते २०२० या कालावधीत आय टी आय मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची कोव्हिड-१९ च्या प्रादुर्भावामुळे शासनाने कोणत्याही प्रकारची परीक्षा घेतली नाही त्यामुळे सर्व विद्यार्थी हा आभ्यासक्रम वेळेत पुर्ण करू शकले नाहीत तरी देखील शासनाने यावर्षी प्रशिक्षणार्थी Apratis भरती घेण्यास सुरवात केलेली आहे. तरी विद्यार्थ्यांची परीक्षा व निकाल लागेपर्यंत कोणत्याही प्रकारची भरती घेण्यात येऊ नये अन्यथा सम्यक विद्यार्थी आंदोलन च्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल असा सम्यक च्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने इशारा देण्यात आला.
दोन्ही निवेदनात नमुद केलेल्या मागण्यांची योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे सरकारी अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले.
यावेळी बारामतीचे मंगलदास भाऊ निकाळजे, रोहित भोसले, विनय दामोदरे, विक्रांत उजगरे, सोहम चव्हाण, निलेश सोनवणे, अविनाश सूर्यवंशी, जिवन महाजन तसेच सम्यक चे सर्व पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते
No comments:
Post a Comment