नुकतेच केंद्र शासनाने वय वर्ष 45 च्या पुढील सर्व नागरिकांसाठी covid-19 ची लस उपलब्ध करून दिली आहे परंतु वय वर्ष 19 ते 45 मधील इतर आजार असणाऱ्या व्यक्तींना व्यक्तींना covid-19 ची लस उपलब्ध नाही ती उपलब्ध करून द्यावी अन्यथा त्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होईल कारण करोना संसर्ग झालेल्यांमध्ये इतर आजार असणार्यांचा मृत्यू दर जास्त आहे असे यावेळी संघटनेतर्फे निदर्शनास आणून देण्यात आले .सदर निवेदनाची प्रत मा. उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य , मा. खासदार बारामती लोकसभा तसेच मा जिल्हाधिकारी पुणे यांना संघटनेच्यावतीने देण्यात येणार आहे.
यावेळी ग्राहक पंचायत बारामती तालुका अध्यक्ष डॉक्टर नवनाथ मलगुंडे सचिव शेखर हुलगे उपाध्यक्ष तानाजी गोफणे प्राध्यापक रवींद्र टिळेकर सचिन बेलदार संतोष जगताप गणेश लोखंडे सचिन मदने शहाजी जांभळे इत्यादी उपस्थित होते
No comments:
Post a Comment