पुणे ग्रामीण जिल्हयातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना 1951 च्या कलम 36 अन्वये अधिकार प्रदान - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, March 18, 2021

पुणे ग्रामीण जिल्हयातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना 1951 च्या कलम 36 अन्वये अधिकार प्रदान

पुणे ग्रामीण जिल्हयातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना 1951 च्या कलम 36 अन्वये अधिकार प्रदान
पुणे, दि.18:- पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी पुणे ग्रामीण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दिनांक 27 मार्च 2021 रोजी रात्री  12  वाजेपर्यंत  महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 36 अनुसार पुणे ग्रामीण जिल्ह्यातील सर्व पोलीस  अधिकाऱ्यांना  खालील प्रमाणे अधिकार प्रदान केले आहेत.
यामध्ये, रस्त्याने जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कशाप्रकारे चालावे त्यानी वर्तणूक किंवा वागणूक कशी ठेवावी. अशा कोणत्याही मिरवणूक या कोणत्या मार्गाने ,कोणत्या वेळात काढाव्यात किंवा काढू नयेत असे मार्ग व अशा वेळा विहित करणे. सर्व मिरवणूकीच्या व जमावाच्या प्रसंगी व उपासनेच्या वेळी व कोणत्याही रस्त्यातून किंवा सार्वजनिक जागी किंवा सार्वजनिक स्थळी गर्दी होणार असेल किंवा अडथळा निर्माण होण्याचा संभव असेल अशा सर्व प्रसंगी अडथळा न होऊ देणे यासाठी योग्य निर्देश देणे. सर्व रस्त्यावर व रस्त्यामध्ये घाट किंवा घाटावर, सर्व धक्यावर व धक्यामध्ये आणि सार्वजनीक स्नानांच्या, कपडे धुण्याच्या व उतरणेच्या जागांच्या ठिकाणी व जागामध्ये सुव्यवस्था राखण्यासाठी योग्य ते आदेश देणे. सार्वजनिक ठिकाणी अगर सार्वजनिक करमणूकीच्या कार्यक्रमाच्या वेळी वापरण्यात येणाऱ्या लाऊडस्पिकरची वेळ, पध्दती, ध्वनी तीव्रता,आवाजाची दिशा यांचे नियंत्रण करणे. सक्षम अधिकाऱ्यांनी या अधिनियमांची कलमे 33,35,37 ते 40,42,43, व 45 या अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशास अधीन असलेले व त्यास पुष्टी देणारे योग्य आदेश देणे.
    

No comments:

Post a Comment