वतन की लकीर चे संपादक तैनूर शेख, सरकारी वकील शहानुर शेख यांच्यासह 31 जनावर प्राण घातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल ..… बारामती:-क्रिकेट खेळताना झालेल्या लहान मुलांच्या भांडणातून आणि जुन्या वादातून बारामती शहरात शुक्रवारी (दि. १९)
रात्री साडे सात वाजेच्या सुमारास दोन गटात राडा झाला. शहर पोलिस ठाण्यात याप्रकरणी परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या असून पोलिसांनी दोन्ही गटाच्या ३१ जणांसह अन्य १० ते १२ अज्ञातांवर प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
साहिल निसार बागवान (रा.गुणवडी चौक, बारामती) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कैश शेख, शहानूर शेख, तैनूर शेख, कैश शेख याची पत्नी व सैफ कैश शेख (रा.श्रावणगल्ली, बारामती) यांच्यासह अन्य १० ते १२ अनोळखींवर दाखल केला आहे. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, साहिल बागवान हे शुक्रवारी फळाच्या गोडाऊनमध्ये हिशेब करत बसले असताना चुलत भाऊ शोयब अलताफ बागवान यांचा त्यांना फोन आला.माझ्या सह सलमान,मुस्तकिम कैश शेख व त्याच्या पत्नीने श्रावणगल्लीत गुरुद्वारामोर मारले असल्याचे त्यांनी फोनवर सांगितले.त्यामुळे साहिल लागलीच भांडण मिटविण्यासाठी दुचाकीवरून जात असता शनी मंदिरासमोर त्याला शोयब, सलमान व मुस्तकिम मन्सूर बागवान हे भेटले. त्यांना घेऊन ते कैश
यांच्याकडे जात असताना आरोपींसह अन्य १० ते १२ अनोळखी लोक दिसले. कैश याने हातात कोयता घेऊन साहिल बागवानला मारला. त्यांनी वार चुकवला. हे पाहून शोयब, सलमान व मुस्तकिम हे पळून गेले. कैश याने पुन्हा कोयता मारला असता तो वाचविण्यासाठी डावा हात पुढे केला असता एक बोट तुटले. त्यानंतर तो शोयब यांच्यामागे पळत गेला. खाली पडलेल्या फिर्यादीला शहानूर याने डोक्यात दगड मारला.
सैफ याने दांडक्याने डोक्यात मारले. फिर्यादी उठून पळून जात असताना आरोपीपैकी कोणी तरी त्यांच्या गळ्यातील दीड तोळ्याची साखळी हिसकावून घेतली. पोलिस ठाण्यापर्यंत ही मारहाण सुरू होती, असे फिर्यादीत म्हटले आहे.दुसर्या बाजूने तैनूर शफिर शेख यानी फिर्याद दिली. त्यानुसार अल्ताफ बागवान, अरबाज अल्ताफ बागवान,सोहेल अल्ताफ बागवान, सलमान अल्ताफ बागवान, शाहीद अल्ताफ बागवान, मुस्तकिन मन्सूर बागवान,निहाल मन्सूर बागवान, पाप्या निसार
बागवान, तन्वीर बागवान, वसीम रफिक बागवान, मुक्तार बागवान,अबरार असिफ खान, सलिम फकिर मोहमद बागवान, अमजद अजिज बागवान, फिराज अजिज बागवान,असिफ जाफर बागवान, फईम उर्फ सलमान फकिर बागवान, तौफिक बेबई बागवान, असिफ अब्दुला खान, शाबाज असिफ खान, मुक्तार अखलाख बागवान, अब्रार आखलाख बागवान, सादिक उस्मान दलाल बागवान, निस्सार बागवान, फरहाण
आयुब बागवान व असिफ रज्जाक बागवान (सर्व रा. बागवान गल्ली,बारामती) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीत नमूद केल्यानुसार रात्री आठ वाजता ही घटना घडली.मदरशाचा भ्रष्टाचार बाहेर काढल्याचा राग मनात धरून आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवत लाकडी काठ्या, दगड, तलवार अशी हत्यारे घेऊन जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने तलवारीने मारहाण केली. त्यानंतर पोलिस तैनूर शफिर शेख यांच्यासह इतरांना घेऊन पोलिस ठाण्याकडे चालत येत असताना त्यांना जीवे ठार मारा, जिवंत सोडू नका, तुकडे करा असे म्हणत मारहाण करून जखमी केले. पोलिस ठाण्याच्या आवारात तिघांनी कैश शेख याला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.तसेच सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी २७ जणांविरोधात पोलिसांनी सरकारी कामात अडथळ्यासह सार्वजनिक आपत्ती अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
No comments:
Post a Comment