5 कोटी साठी बारामतीत युवकाचे झाले अपहरण.. बारामती तालुक्यातील लिमटेक येथील कृष्णराज धनाजी जाचक या 24 वर्षीय युवकाचे 12 मार्च रोजी रात्री 7.15 ते 7.30 च्या दरम्यान जळोची रोडवरील पानसरे ड्रीम सिटीच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेतून अपहरण करण्यात आले. याप्रकरणी पृथ्वीराज ज्ञानदेव चव्हाण (रा. विघ्नहर्ता अपा्टमेंट संभाजीनगर) यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चार अज्ञात आरोपींनी हा गुन्हा केल्याचे दिसून आले आहे.पंचवीस ते तीस वर्ष वयोगटातील चौघांनी टोयाटो कंपनीच्या इटिओस गाडीतून येऊन पृथ्वीराज ज्ञानदेव चव्हाण यास काठीने डाव्या पायावर मारून कृष्णराजला जबरदस्तीने गाडीत घालून नेले व गाडीत घालून नेतेवेळी मोबाईलवरून फोन करेल म्हणून पृथ्वीराज याचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल हिसकावून घेऊन, तसेच कृष्णराज याच्या मोटरसायकलची चावी हिसकावून घेऊन त्याला पळवून
घेऊन गेले.रात्री 9 वाजून 30 मिनिटांनी कृष्ण राज याच्या फोनवरून त्याच्या वडिलांच्या म्हणजे धनाजी जाचक यांच्या फोनवर फोन करून अज्ञात चोरट्यांनी पाच कोटी रुपयांची खंडणी द्या, नाहीतर मुलाला मुकाल अशी धमकी दिली. त्यावरून शहर पोलिसांनी अज्ञात चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
No comments:
Post a Comment