बारामती:-शिवजयंती उत्सव समिती बारामती व शहर पोलिस स्टेशन यांचे सहकार्याने नागरिकांना 5000 मास्क वाटप करण्यात आले . नागरिकांना विना मास्क दंडात्मक कारवाई करण्या पेक्षा त्यांना मास्क वाटप करावे अशी संकल्पना होती.
तसेच या वर्षी शिवजयंती 31 मार्च रोजी येत असुन कोरोना च्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स ठेऊन धुम धडाक्यात साजरी करावी असे आवाहन शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष सुनिल (आण्णा) शिंदे यांनी केले.सदर कार्यक्रमास पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे हेमंत नवसारे , अँड हरीश तावरे ,देवेंद्र बनकर ,छगन आटोळे विशाल पाटील ,बाप्पू बागल कैलास सावंत, संजय किर्वे, विकी आगम ,विवेक साळुंके व इतर शिवप्रेमी हजर होते
No comments:
Post a Comment