महाराष्ट्र सरकारने पुरवणी अर्थसंकल्पात आर्थिक तरतुद करून धनगर समाजाला योग्य
तो न्याय द्यावा ह्या मागणीचे निवेदन.... बारामती:-बारामती मध्ये नुकताच घेतलेल्या पत्रकार परिषद मध्ये महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात धनगर समाजासाठी कोणतीही तरतुद केलेली नाही. त्यामुळे समाजात प्रचंड नाराजी पसरली आहे. तरी धनगर समाज खालील मागण्या महाराष्ट्र शासनाकडे करीत आहे.१. महाराजा यशवंतराव होळकर यांच्या नावाने उद्योजक महामंडळ स्थापन करून उद्योजकांना आर्थिक अनुदान द्यावे.२. अहिल्यादेवी घरकुल योजना केली आहे. ती फक्त भटक्या विमुक्त जाती यांनाच या योजनेचा लाभ मिळावा.३. अहिल्यादेवी विकास महामंडळास आर्थीक तुरतुद करण्यात यावी.४. राज्यात प्रत्येक तालुक्यात धनगर समाजासाठी सरकारी जागेसह सामाजीक सभागृह देण्यात यावे.५. राज्यात प्रत्येक तालुक्यात धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी सरकारी जागेसह वस्तीगृह करावे.
६. वाफगांव ता.खेड जि.पुणे येथे येथे यशवंतराव होळकर यांचे अंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक करावे.
७. मेंढपाळ बांधवांसाठी १ रूपयामध्ये १० लाख रूपयाचा अपघाती व नैसर्गीक अपत्ती विमा व शेळी-मेंढीसाठी विमा लागु करावा.
८. धनगर समाजाने वेळोवेळी सरकारला २२ योजनेची मागणी केली होती. त्या २२ योजनांचा लाभ धनगर समाजाला लागू करण्यात यावा.
यासाठी सरकारने पुरवणी अर्थसंकल्पात याची आर्थिक तरतुद करून धनगर समाजाला योग्य
तो न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले यावेळी गणपत
(आबा)पाटील, संपत (भाऊ) टकले,डॉ.अर्चना पाटील,श्री बापूराव सोलनकर,श्री.वसंत धुले श्री.चंद्रकांत वाघमोडे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment