याची फिल्मी स्टाईल सुटका !!
बारामती:-काही तासाच्या आत बारामती येथील लिमटेक येथील कृष्णराज धनाजी जाचक यांच्या अपहरण प्रकरणाचा छडा बारामती पोलिसांनी
अवघ्या बारा तासात लावला असून, गुन्ह्यातील टोळीचा बारा तासात पर्दाफाश केला आहे.बारामती पोलिसांनी मोगराळे घाटात डोंगरद्यातून अनिल लक्ष्मण दडस, गौरव साहेबराव शेटे, संतोष शरणाप्पा कुडवे यांना ताब्यात घेऊन कृष्णराज धनाजी जाचक यांची सुटकाकेली. एखाद्या फिल्म स्टाईल हॉरर चित्रपटाला शोभेल अशीच कामगिरी बारामती पोलिसांनी केली आणि बारामतीच्या गुन्हे शोध घेण्याच्या प्रक्रियेमध्ये मानाचा तुरा खोवला काल रात्री जळोची रोड येथील पानसरे ड्रीम सिटीच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेतून
कृष्णराज धनाजी जाचक याचे अपहरण झाल्याची फिर्याद पृथ्वीराज ज्ञानदेव चव्हाण (रा.संभाजीनगर) या युवकाने दिली होती. दरम्यान चार जणांनी पृथ्वीराज यास बांबूच्या काठीने डाव्या पायाला मारहाण करत कृष्णराज याचे अपहरण केले आणि हे अपहरण टोयोटा
कंपनीच्या इटियोस गाडीतून करण्यात आले, जाताना त्यांनी कृष्णराज याच्या मोटर
सायकलची चावी आणि पृथ्वीराज चव्हाण याचा
सॅमसंग कंपनीचा मोबाइल ते घेऊन गेले.अपहरणकर्ते पंचवीस ते तीस वर्ष वयोगटातील होते आणि चार जण होते अशी माहिती पृथ्वीराज चव्हाण याने पोलिसांना दिली व तशा स्वरूपाची फिर्याद पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. त्यानंतर रात्री साडेनऊ वाजता कृष्णराज याचे वडील धनाजी जाचक यांच्या मोबाईलवर अपहरणकर्त्यांनी पाच कोटी रुपयांची खंडणी मागितली. त्यामुळे बारामती शहर पोलीस सतर्क झाले. त्यांनी तातडीने आज पहाटे सव्वा तीन वाजता गुन्हा नोंदवला आणि तातडीने तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
अपहरणकरत्त्यांनी धनाजी जाचक यांच्या फोनवर फोन करून पाच कोटींची खंडणी मागितली होती. त्यावरून बारामती शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नामदेव शिंदे यांनी तातडीने पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांना डॉक्टर अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी
नारायण शिरगावकर यांना माहिती कळवली.
गुन्ह्याचे गांभीर्य कळवले आणि तपास पथके तयार करून सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघमारे, दंडीले,भावसार, निंबाळकर यांची चार पथके तयार केली आणि कृष्णराज याचे वडील धनाजी जाचक यांच्या संपर्कात राहून त्यांना येणार्या मोबाईलची तांत्रिकदृष्ट्या निरीक्षण करून, बारामती शहर,फलटण, दहिवडी परिसरात तपास केला. त्यानंतर मोगराळे घाटामध्ये ही सर्व पथके पोहोचली.त्यानंतर तेथे अनिल लक्ष्मण दडस( राहणार दु्धबावी तालुका फलटण) गौरव साहेबराव शेटे(वय वीस वर्षे राहणार वायसेवाडी खेड तालुका कर्जत) आणि कारचा चालक संतोष शरणाप्पा कुंडवे (राहणार चंदन नगर सर्वे नंबर 49 पुणे) या तिघाजणांना ताब्यात घेऊन गाडीतून कृष्णराज धनाजी जाचक याची सुटका केली. त्याचबरोबर टोयाटो कंपनीची कार (एम एच 14 जी 18) ताब्यात घेतली. या कामगिरीसाठी पोलीस अधीक्षक डॉ अभिनव
देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते,
उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण
शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस
निरीक्षक नामदेव शिंदे, सहायक निरीक्षक प्रकाश
वाघमारे, उमेश दंडीले, फौजदार गणेश निंबाळकर,सहायक फौजदार संजय जगदाळे, पोलीस हवालदार शिवाजी निकम, रुपेश साळुंखे, ओमकार सिताफ, दादासाहेब डोईफोडे, तुषार चव्हाण,दशरथ इंगोले, जितेंद्र शिंदे यांच्यासह पुण्यातील सायबर पोलिस ठाण्याचे सुनील कोळी, चेतन पाटील, भगवान थोरवे, रणजीत देवकर, गोपाळ ओमासे, अतुल जाधव या पथकाने कामगिरी केली.याबाबत या टीमला 15 हजाराचे बक्षीस देण्यात आले.
No comments:
Post a Comment