विधवा महिलेवर वरिष्ठ पोलिस निरीक्षकाकडून
बलात्कार
नागपूर(प्रतिनिधी) :- रोज नविन नवीन घटनेमुळे पोलिस खात् बदनाम होत चाललंय, महाराष्ट्रात पोलिसांचे काम असताना काही पोलिस अधिकारी मुळे पोलिस खात्यात नाराजी पसरली आहे अशीच एक घटना घडली,नागपूरमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. गुन्हेगारांवर वचक ठेवण्याचे काम पोलिसांवर आहे. मात्र पोलिसांवरच गुन्हे दाखल होत असतील तर न्याय कोणाकडे मागायचा
असा सवाल सर्वसामान्य नागरिकाला पडला आहे. पोलिसांचे कारनामे पुढे येत असल्याने नागपूर पोलिसांचीच नाही तर महाराष्ट्र पोलीस दलाची मान शरमेने खाली गेली आहे. गेल्या 24 तासात 5 पोलिसांचे निलंबन करण्यात आले असून यामध्ये दोन पोलिस अधिकार्यांचा समावेश आहे.नागपूर पोलीस दलातील एका पोलीस
निरीक्षकावर बलात्काराचा गुन्हा दाखल
करण्यात आला आहे. अरविंद भोळे असे गुन्हा
दाखल करण्यात आलेल्या पोलिस निरीक्षकाचे
नाव आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर अरविंद
भोळे यांना निलंबित करण्यात आले आहे. भोळे
यांच्यावर गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत
एका विधवेचे शारीरिक शोषण केल्याने त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरविंद भोळे मुख्यालयात कार्यरत होते.
No comments:
Post a Comment