महाराष्ट्र शासनाची महालॅब इंदापूर यांच्या सौजन्याने पोलिस स्टेशनचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांची रक्त चाचणी तपासणी - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, March 13, 2021

महाराष्ट्र शासनाची महालॅब इंदापूर यांच्या सौजन्याने पोलिस स्टेशनचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांची रक्त चाचणी तपासणी

महाराष्ट्र शासनाची महालॅब इंदापूर यांच्या सौजन्याने पोलिस स्टेशनचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांची रक्त चाचणी तपासणी                                                                           इंदापूर:-महाराष्ट्रात कोरोनाचा हाहाकार माजला असताना प्रशासन वेळोवेळी नागरिकांना काळजी घेण्याची व सूचनांचे पालन करण्यासाठी प्रयत्न करीत असून त्याप्रमाणे काम करीत आहे,यामध्ये प्रामुख्याने पोलीस यंत्रणा मोठया प्रमाणात काम करीत असते,हे काम करीत असताना स्वतःच्या शरीराच्या आरोग्यासाठी काळजी घेण्यासाठी वेळ नसतो म्हणून    महाराष्ट्र शासनाची महालॅब इंदापूर यांच्या सौजन्याने भिगवण पोलिस स्टेशनचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांची रक्त चाचणी  मा.ना. दत्तात्रय मामा भरणे (राज्यमंत्री) महाराष्ट्र राज्य व पालकमंत्री सोलापूर जिल्हा.यांच्या विचाराने महाराष्ट्र शासनाची महालॅब इंदापूर यांनी पोलिस अधिकारी व कर्मचारी यांची मोफत रक्त चाचणी केली यावेळी वालचंदनगर स्टेशन जंक्शन पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी मा.श्री दिलीप पवार साहेब तसेच जंक्शन गावाचे माजी उपसरपंच श्री फिरोज सय्यद यांच्या संकल्पनेतून आज दि.13 मार्च रोजी पोलिस स्टेशन येथे रक्त चाचणी करण्यात आली यावेळी प्रभारी अधिकारी भिगवण पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री जीवन माने साहेब व पोलिस उपनिरीक्षक विनायक दडस-पाटील व सर्व कर्मचारी यांची चाचणी करण्यात आली यावेळी मोलाचे योगदान हिंद महालॅब च्या अंतर्गत लॅब टेक्निशियन प्राथमिक आरोग्य केंद्र कळसचे श्री सूरज जमाल सय्यद, एल. बी.एम. श्री.मिलिंद पवार ,लॅब इनचार्ज प्रदीप मुळीक, अजित गायकवाड, रेश्मा चौगुले मॅडम, नागनाथ जाधव,सोहेल मुलाणी,प्रा.आ. केंद्र संसर प्रशांत बनसोडे, प्रा.आ. केंद्र लासुर्णे आकाश जामदार या टीम ने हे कार्य यशस्वी रित्या पार पाडली. यावेळी सर्व टीमचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री जीवन माने  यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment