*भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समिती २०२१ ची कार्यकारणी जाहीर*
बारामती.दि.१९ : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीने दि.१७ मार्च रोजी समाज बांधवांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.बैठकीच्या सुरुवातीलाच आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ मार्गदर्शक दिवंगत प्रा.एस.पी कदम सर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यामध्ये गेल्या वर्षीच्या जयंती महोत्सव समितीच्या कार्यकारिणीने अहवाल सादर करत समिती बरखास्त करून सन २०२१ साठी नवीन समितीची कार्यकरणी जाहीर केली.त्या मध्ये कैलास शिंदे,ॲड.सुशिल अहिवळे,सचिन काकडे,प्रा.रमेश मोरे,गौतम शिंदे,चेतन शिंदे,गजानन गायकवाड,सचिन जगताप,शुभम अहिवळे,चंद्रकांत भोसले,सिद्धार्थ शिंदे,मनोज केंगार,सोमनाथ रणदिवे ,कृष्णा सोनवणे,सुशिल भोसले,भास्कर दामोदरे,शंकर गव्हाळे यांची एकमताने निवड करण्यात आली.तर जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते किशोर सोनवणे यांनी या बैठकीचे अध्यक्ष स्थान भूषविले.
दरम्यान,बारामतीत वाढत असलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने केलेल्या सर्व सूचनांचे आणि नियमांचे पालन करून विधायक पद्धतीने जयंती कशी साजरी केली जाईल या वर भर दिला जाणार असून दरवर्षी प्रमाणे दि.१४ एप्रिल रोजी निघणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या शोभायात्रे संदर्भातला निणर्य कोविड-१९ च्या प्रादुर्भावाची परिस्थिती विचारात घेऊन योग्य वेळी जाहीर केला जाईल.असं या नवनिर्वाचित समितीच्या सदस्यांनी सांगितले
No comments:
Post a Comment