बारामतीमध्ये भ्रष्ट सरकारच्या विरोधात भा.ज.पा. चे "ढोल बजाओ, महाराष्ट्र बचाओ" आंदोलन...
बारामती:-शेतक-यांची फसवणूक आणि वीज कनेक्शन कट केल्याच्या निषेधार्थ भाजपा बारामती शहर व तालुक्याच्या वतीने भिगवण चौक येथे ढोल बजाओ आंदोलन करून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले,महाराष्ट्रात महाभकास आघाडी सरकारच्या कार्यकालामध्ये सतत होत असलेल्या भ्रष्टाचार व
पुजा चव्हाण प्रकरण, धनंयज मुंडे प्रकरण अशा अनेक प्रकरणांमुळे महिलांच्या असुरक्षिततेची प्रश्न निर्माण होत असल्याने तसेच कोरोना सारख्या संसर्गजन्य रोगास आटकाव आणण्यासाठी असमर्थ ठरलेल्या गोंधळलेल्या
तिघाडी सरकारमुळे सध्याची परिस्थीतीची अराजकतेकडे वाटचाल होत असल्याने महाराष्ट्र राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी बारामती भा. ज.पा. तर्फ मागणी करण्यात आली आहे व नैतिकतेच्या अधारावर विद्यमान गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपला त्वरीत राजीनामा द्यावा अशी मागणी केलेली आहे.तसेच महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱयांना संपुर्ण कर्जमाफी जाहिर करूनही संपूर्ण कर्ज माफी दिली नाही, तसेच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रूपये खात्यात जमा करण्याची घोषणा करूनही अद्यापही एकाही शेतकर्याच्या खात्यात सदरील रक्कम जमा केलेली नाही. तसेच शेतीची व घरगुती वीज कनेक्शन कट न करण्याचे आश्वासन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार यांनी
विधानसभेत देऊनही अधिवेशन संपण्याच्या शेवटच्या दिवशीच शेतकर्यांचे वीज कनेक्शन कट करणेचे आदेश देऊन लाखो शेतकरयांचे व सर्वसामान्य नागरीकांचे वीज कनेक्शन कट करणेत आले आहेत.तसेच बारामती तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतमधील पाणीपुरवठा योजनेचे वीज कनेक्शन कट केल्यामुळे ऐन उन्हाळ्यात गावक-्यांना पाण्यासाठी वनवन करावे लागत आहे. बारामती मध्ये देखील ऐन उन्हाळ्यात हजारो शेतक-्यांचे वीज कनेक्शन कट करणेत आले असून ट्रान्सफार्मर बंद केले आहेत.बारामती शहर मधून जात असलेल्या नीरा डावा कालव्याचे सिमेंट काँक्रीटकरण केल्याने होणारा पाझर बंद होऊन अनेक विहीर व बोअर कोरडे पड़ून अनेक बारामती शहर वासीयांना पाणी समस्याला
तोंड द्यावे-लागणार आहे. बारामती व महाराष्ट्रातील शेतकरी व नागरिक हे कोविडच्या काळात प्रचंड आर्थिक अडचणीत असताना सरकारचे हे कृत्य अत्यंत दुर्देवी, निंदनीय व निषेधार्थ आहे.या विषयी भाजपा बारामती शहर व तालुक्याच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व बारामती तालुक्याचे आमदार श्री. अजितदादा पवार यांचे या विषयावर लक्ष वेधून घेणेकरीता त्यांचे ढोल बाजाओ आंदोलन करून महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्याची व जनतेची फसवणूक केल्याचे दाखवून दिले. तसेच सध्याचे महाविकास आघाडी सरकार हे सरकार चालविण्यात अपयशी ठरल्याचे दिसून येते. तसेच सदर प्रकरणांमध्ये सरकारने लक्ष न दिल्यास अशाच प्रकारची आंदोलने करून जनतेची होणारी नुकसानी थांबविण्यास कटीबद्ध राहील असे प्रसिद्धी पत्रात म्हणले आहे यावेळी भाजप कार्यकर्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले,हे आंदोलन भाजप तालुका अध्यक्ष पांडुरंग कचरे, भाजप शहर अध्यक्ष सतीश फाळके सह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment