रुग्ण हक्क परीषदेच्या कार्यकर्त्याला तात्काळ एक लाख रुपयांचे कर्ज देऊ - नम्रता पवार
*पुणे -दि. 22* उमेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली रुग्ण हक्क परीषदेचे कार्यकर्ते निस्वार्थीपणे लोकसेवेचे काम करत असतात. रुग्णांची सेवा आणि मदत करत असतात. राज्यात ठिकठिकाणी शाखा आणि विविध कार्यक्रम - उपक्रम राबवित असल्यानेच, आज रुग्ण हक्क परिषद चौथा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. रुग्ण हक्क परिषदेसाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिले, अश्या सर्वांना आम्ही धन्यवाद देतो. आणि म्हणुनच रुग्ण हक्क परिषदेच्या कार्यकर्त्याला एक टक्का व्याजदराने एक लाखाचे कर्ज आम्ही महा-रजत अर्बन बँकेकडून जाहीर करत आहोत, असे महारजत अर्बन बँकेच्या संचालक नम्रता पवार म्हणाल्या.
वर्धापन दिनानिमित्त झालेल्या बैठकीत नम्रता पवार बोलत होत्या. रुग्ण हक्क परिषदेने या चार वर्षात पृथ्वी मेडिकल फाउंडेशन, आरएचपी मीडिया अँड प्रॉडक्षन हाऊस प्रा. लि. आणि आपल्या हक्काची वित्तसंस्था म्हणून महा-रजत अर्बन बँक लि. या संस्था यशस्वीपणे उभ्या केल्या. रुग्ण हक्क परिषदेत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यामुळेच हे सर्व उभे करणे, आम्हाला शक्य झाले. आम्ही सर्वांना धन्यवाद देतो.
रुग्ण हक्क परिषद सर्वांची काळजी घेत असते. प्रत्येकाला वेळेवर उपचार, हाताला काम आणि दोन वेळचे जेवण मिळाले पाहिजे, अशी आमचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांची भूमिका आहे. आम्ही आमच्या कार्यकर्त्याला आर्थिकदृष्टीने सक्षम करू. त्याला आधार देऊ आणि म्हणूनच रुग्ण हक्क परिषदेच्या कार्यकर्त्यांना एक लाख रुपयांची कर्ज योजना आम्ही निर्माण केली, असेही नम्रता पवार म्हणाल्या.
No comments:
Post a Comment