बारामती मधील वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे आठवडा बाजार बंद
बारामती दि. 20 :- बारामती तालुक्यातील वाढता कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी व त्यावर नियंत्रण करणे , उपाययोजना करणे आवश्यक असल्याने तसेच शासन निर्णय परिपत्रकातील सूचनेनुसार बारामती शहरात दर गुरूवारी भरणारा आठवडा बाजार बंद करण्यात येत आहे.
बारामतीमध्ये कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे पुढील आदेश होईपर्यत बारामती शहरातील दर गुरूवारी भरणारा आठवडा बाजार बंद राहणार आहे. असे एका पत्रकान्वये नगरपरिषद मुख्याधिकारी किरणराज यादव यांनी कळविले आहे.
No comments:
Post a Comment