महा-रजतकडे' रुग्ण हक्क परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कर्जाचे १०० हुन अधिक अर्ज दाखल - अपर्णा साठे
पुणे :- कोरोनामुळे नोकरी - व्यवसाय डबघाईला आलेले आहेत. आर्थिक ओढाताण आणि महिन्याच्या बजेटमध्ये लोकांना काटकसर करावी लागत आहे. अश्या परिस्थितीत भांडवला अभावी लोकांना नवा उद्योग - व्यवसाय उभारता येत नाही, ही बाब लक्षात घेऊन महा-रजत अर्बन बँकेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी रुग्ण हक्क परिषदेच्या कार्यकर्त्यांना १% व्याजदराने कर्ज देण्याचे जाहीर केले. त्यामुळे आजअखेर पर्यंत १०० हुन अधिक कार्यकर्त्यांनी कर्ज मागनीचे अर्ज केले आहेत. अशी माहिती महा-रजत अर्बनच्या संचालक अपर्णा साठे यांनी दिली.
अपर्णा साठे म्हणाल्या की, २ एप्रिल २०२१ पासून महा-रजत अर्बन बँकेच्या गोखलेनगर येथे दुसऱ्या शाखेचे उदघाटन होणार आहे. दोन शाखामध्ये काम चालणार असल्याने लवकरात लवकर लोकांची कामे पूर्ण करण्याकडे आमचा प्रयत्न आहे.
कर्जाची पूर्तता वेगाने व्हावी, यासाठी सर्व संचालक मंडळाचे प्रयत्न असतात. लवकरच विश्रांतवाडी भागात तिसरी शाखा सुद्धा सुरू होईल. इतरापेक्षा रुग्ण हक्क परिषदेच्या कार्यकर्त्यांना वैयक्तिक कर्ज एक लाख तर व्यावसायिक कर्ज दोन लाख रुपये देण्याची आमची तयारी आहे, असेही अपर्णा साठे म्हणाल्या.
No comments:
Post a Comment