*नागरी वस्तीत दोन भल्या मोठ्या नागांचे भांडण*
बारामती:-सध्या उन्हाळ्याची धग वाढत चालले आहे.अशातच सापासारखे थंड रक्ताचे प्राणी गारव्यासाठी बाहेर पडत आहेत.तसेच बरेच सापांचे या दिवसात मिलनाचा वेळ असतो,यात प्रामुख्याने नाग व धामण साप येतात.
बारामतीतील जगताप मळा परिसरात राहणारे अतुल उद्धव पवार यांच्या अंगणात दुपारी दोनच्या सुमारास दोन भले मोठे नाग एकमेकांशी भांडताना दिसून आले,त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले,तेथील सतर्क नागरिकांनी ग्रीन वर्ल्ड फाऊंडेशन, बारामती या संस्थेच्या सर्पमित्रांशी संपर्क साधला,अवघ्या दहा मिनिटात सर्पमित्र विकी आगम हे उपस्थित राहिले.त्यांनी मोठ्या शिताफीने या दोन्ही नागांना पकडले.सर्पमित्र विकी आगम यांनी सांगितले की हे दोन्ही नर जातीचे नाग असून एका मादी साठी हे दोन नाग भांडत आहेत.तरी आपल्या परिसरात साप आढळून आल्यास घाबरून न जाता ग्रीन वर्ल्ड फाउंडेशन, बारामती या संस्थेच्या हेल्पलाइन नंबर 9860504076 वरती संपर्क साधावा, असे आवाहन सर्पमित्र विकी आगम यांच्याकडून करण्यात आले.
No comments:
Post a Comment