खेळणाऱ्या मुलांवर पोलिसांची दगडफेक पवना नदीत उडी मारल्याने दोघांचा मूर्त्यु .. याघटनेची चौकशी करण्यात यावी - प्रदेश अध्यक्ष हरीभाऊ गायकवाड. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, March 18, 2021

खेळणाऱ्या मुलांवर पोलिसांची दगडफेक पवना नदीत उडी मारल्याने दोघांचा मूर्त्यु .. याघटनेची चौकशी करण्यात यावी - प्रदेश अध्यक्ष हरीभाऊ गायकवाड.

खेळणाऱ्या मुलांवर पोलिसांची दगडफेक पवना नदीत उडी  मारल्याने दोघांचा मूर्त्यु .. याघटनेची चौकशी करण्यात यावी - प्रदेश अध्यक्ष हरीभाऊ गायकवाड.                                                                                                     पुणे(प्रतिनिधी):- लातूर जिल्हातील  टकारी समाजाचे काही कुटुंबे पुणे येथे काळेवाडी भागामध्ये कामासाठी गेल्या अनेक दिवसा पासून रहात आहेत  दि. १४/३/२०२१ रोजी आपले काम अटपून क्रिकेट खेळण्यासाठी घरा बाहेर गेले पवना नदीशेजारी थेरगाव स्मशानभूमी शेजारी मैदानात क्रिकेट खेळत होते काहीजण टाईमपास म्हणून पत्ते खेळत होते तेवढ्यात पोलीस आले त्यांनी  झाडाखाली बसलेल्या व क्रिकेट खेळणाऱ्या मुलांवर दगड फेक चालू केले व पाठीमागे पोलीस लागले हे बघून खेळणारे मुले भीतीपोटी सैरावैरा पळू लागले यामध्ये 4 मुलांनी शेजारच्या पवना नदीत घाबरून पूलावरून उड्या मारल्या  व त्यात  मरगू गायकवाड व ओम जाधव  (सलगरा लातूर जिल्हा) हे दोघे बुडून मूर्त्यु पावले व नरसिग जाधव( रा. रामेगाव) व रवी गायकवाड (रा.धनेगाव)  हे दोघे पोहून बाहेर आले  एकाचे प्रेत दुसऱ्या दिवशी दूपारी मिळाले तर दुसऱ्याचे दुसऱ्या दिवशी रात्री  उशीरा मिळाले  यासाठी पुणे महापालीका व एनडीआरची टीम यांनी खूप प्रयत्न करून मुलांना बाहेर काढले घटनेमुळे महाराष्ट्र भर  हळहळ व्यक्त करण्यात येत असून या घटनेला जबाबदार असणाऱ्याचा निषेध केला या घटनेची चौकशी करून  दोषीना अटक करण्यात यावी  अशी मागणी विमूक्त भटके आदीवाशी महासंघच्या वतीने  करण्यात येणार असल्याची माहिती प्रदेश अध्यक्ष हरिभाऊ गायकवाड व पुणे जिल्हा अध्यक्ष संतोष जाधव यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment