पालकमंत्र्याच्या दारात कर्जमाफी व विजबिल माफी साठी भाजपचे ढोल बजावो आंदोलन...
बारामती:-शेतक-यांच्या बांधावर जाऊन नुकसान भरपाई न देणे, संपूर्ण कर्जमाफी करून ७/ १२ कोरा न करणे, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतक-्यांच्या खात्यावर ५० हजार रूपये जमा न करणे,शेतक-यांची कोविडच्या काळातील वीज बिल माफ न करता उलट कारवाई करून वीज
कनेक्शन कट केलेबाबत. तसेच बारामती शहरातील निरा डावा कालव्याचे काँक्रीटीकरणाचे काम थांबविणे करीता महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांचे घरासमोर ढोल वाजवून निवेदन देणेकरीता परवानगी मिळणेसाठी नुकताच बारामती शहर पोलीस स्टेशनला भारतीय जनता पार्टी बारामती च्या वतीने निवेदन देण्यात आले यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना संपुर्ण कर्जमाफी जाहिर करूनही संपूर्ण कर्जमाफी दिली नाही, तसेच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रूपये खात्यात जमा करण्याची घोषणा करूनही अद्यापही शेतकर्यांच्या खात्यात सदरील रक्कम जमा केलेले नाहीत. तसेच शेतीची व घरगुती वीज
कनेक्शन कपात न करण्याचे आश्वासन विधानसभेत देऊनही अधिवेशन संपण्याच्या शेवटच्या दिवशीच शेतक-्यांचे वीज कनेक्शन कट करणेचे आदेश देऊन लाखो शेतकऱ्यांचे व सर्वसामान्य नागरीकांचे वीज कनेक्शन कट करणेत आले आहेत.तसेच बारामती तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतमधील पाणीपुरवठा योजनेचे वीज कनेक्शन कट केल्यामुळे ऐन उन्हाळ्यात गावक-्यांना पाण्यासाठी वनवन करावे लागत आहे. बारामती मध्ये देखील ऐन उन्हाळ्यात हजारो शेतक-्यांचे वीज कनेक्शन कट करणेत आले असून ट्रान्सफार्मर बंद केले आहेत.बारामती शहर मधून जात असलेल्या नीरा डावा कालव्याचे सिमेंट कॉक्रीटकरण केल्याने होणारा पाझर बंद होऊन अनेक विहीर व बोअर कोरडे पडून अनेक बारामती शहर वासीयांना पाणी समस्याला
तोंड द्यावे लागणार आहे. बारामती व महाराष्ट्रातील शेतकरी व नागरिक हे प्रचंड आर्थिक अडचणीत असताना सरकारचे हे कृत्य अत्यंत दुर्देवी, निंदनीय व निषेधार्थ आहे.या विषयी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व बारामती तालुक्याचे पालकमंत्री श्री. अजितदादा पवार यांचे या विषयावर लक्ष वेधून घेणेकरीता त्यांचे सहयोग सोसायटी मधील घरासमोर ढोल वाजवून रविवार दि. २१/०३/२०२१ रोजी सकाळी ११.०० वा. आंदोलन करणेत येणार आहे. आंदोलन काळात मास्क व सामाजिक अंतराचे पालन करणेत येईल सदर आंदोलनास परवानगी द्यावी असे पत्र पांडुरंग कचरे तालुका अध्यक्ष भा.ज.पा. बारामती, व सतीश फाळके
शहर अध्यक्ष भा.ज.पा. बारामती देऊन दिलेल्या प्रसिद्ध पत्रकात सांगितले.
No comments:
Post a Comment