कोवीड-१९ या साथीच्या रोगावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेसाठी बारामती येथे राष्ट्रवादीचे
पदाधिकारी वगळता अन्य सर्व विरोधी पक्षाला डावलले जात असल्याचा भाजपचा आरोप
बारामती:-बारामतीचे उपविभागीय अधिकारी श्री. दादासाहेब कांबळे हे मागील एक वर्षापासून सुरू असलेल्या कोवीड-१९ या साथीच्या रोगाबाबत उपाययोजना करण्याकरीता अकार्यक्षम व पक्षपातीपणामुळे साथीच्या रोगाचे गांभिर्य सोडून फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यांना बोलावून अत्यंत गंभीर अशा कोवीड-१९ आजाराबाबत राजकीय धोरण अवलंबुन राष्ट्रवादीचे नगरसेवक व पदाधिकारी, बारामतीचे मुख्याधिकारी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व इतर विभागाचे अधिकारी यांना घेवून उपाययोजना करण्याबाबत केवळ मिटींग फार्स करीत असतात. असे असताना आजतागायत एकदाही सत्ताधारी पक्षाचे सोडून इतर कोणत्याही अन्य पक्ष प्रमुखांना,पदाधिकारी अथवा विरोधी पक्ष नगरसेवक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांना कधीही मिटींगमध्ये बोलवुन त्यांचे मत
विचारात घेऊन विचार विनीमय केला जात नाहीत ही वरतुस्थिती आहे. हे सर्व लोक मिळून एकतर्फी स्वहिताचा निर्णय घेतात व अशा गंभीर आजाराच्या बाबतीत आरोग्य रूग्णालय उभारन्याचा फार्स करून महाराष्ट्र शासनाच्या
कोट्यावधी रूपयांचा अपहार केला जातो ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. विभागीय अधिकारी हे शासनाचे प्रतिनिधी आहेत ते त्यांच्या कर्तव्यामध्ये तटस्थ राहून काम करणे अपेक्षित असताना ते स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याप्रमाणे भूमिका घेऊन काम करतात. अशा त्यांच्या वागणुकीमुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होत आहे. त्यामुळे काम करणारे इतर सर्व पक्ष डावलेले जाऊन बारामती तालुका व शहरामध्ये हुकूमशाही बोकाळत आहे. कोवीड-१९ साथीच्या रोगाचे कुठलेही सामाजिक भान न ठेवता सत्तेच्या असणाऱ्या एकतर्फी बळावर हे सर्व चालु आहे याला त्वरीत लगाम घालणे सर्वसामान्य जनतेच्या आरोग्यासाठी व कर रूपी जमा होणाऱ्या जनतेच्या
पैश्याचा अपव्यय टाळणेसाठी अत्यंत गरजेचे वाटते.बारामती शहर व तालुक्याची खरी कोवीड-१९ या महामारीच्या काळामध्ये चालु असलेली ठेकेदारी व एकतर्फी चालु असलेली वस्तुस्थिती आपल्या निदर्शनास आणुन देणे ही आमची नैतिक जबाबदारी आहे.अशा गोष्टीमुळे सध्या कोवीड-१९ महामारीत महाराष्ट्रात पुणे जिल्हा तर तालुका स्तरावर महाराष्ट्रात
बारामती तालुका पहिल्या क्रमांकावर आहेत. तरी येथुन पुढे बारामती शहर व तालुक्याच्या बाबतीत कोणताही निर्णय घेताना सर्व पक्षांचे प्रमुख व पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन सदरचे काम करणेबाबत आपणांकडून योग्य त्या सुचना करणेत याव्यात. तसेच कोवीड-१९ महामारीमध्ये बारामती शहर व तालुक्यामध्ये कोरोना आजाराच्या उपचारासाठी शासनाने वितरीत केलेला निथी याचे शासकीय स्तरावर लेखापरिक्षण होवून त्याचा आर्थिक अहवाल प्रसिध्द करणेबाबत आपण योग्य ते आदेश करावेत.असे निवेदन उपविभागीय अधिकारी
बारामती उपविभाग,बारामती याना पांडुरंग कचरे तालुका अध्यक्ष भा.ज.पा. बारामती, सतीश फाळके बारामती शहर अध्यक्ष,गोविंद देवकाते जिल्हा कार्यकारीनी सदस्य भा.ज.पा. पुणे जिल्हा
यांनी दिले तर याबाबत माहितीसाठी प्रत १) मा. देवेंद्रजी फडणवीस सो., विरोधीपक्ष नेते, महाराष्ट्र राज्य.२) मा. राजेश देशमुख सो., जिल्हाधिकारी पुणे जिल्हा.३) मा. मुख्याधिकारी सो., बारामती नगरपरिषद, बारामती यांना देखील दिले असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे.
No comments:
Post a Comment