आर्थिक मदतीचे आमिष : बनावट मेसेजला बळी पडू नये- श्रीमती ए.एस.कांबळे
पुणे दि.18:- 1 मार्च 2020 ते 28 फेब्रुवारी 2021 या कालावधीत ज्या घरातील 21 ते 70 या वयोगटातील कर्त्या व्यक्तीचे निधन झाले आहे अशा विधवा झालेल्या महिलांना महिला व बाल विकास विभागाच्या जिजामाता / जिजाऊ या योजनेंतर्गत रु. 50 हजार प्रती लाभार्थी मिळतील अशी पोष्ट सोशल मिडीयाद्वारे व्हाट्सॲप वर व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आले आहे. सदरची पोष्ट ही खोटी व बनावट असून अशा प्रकारची कोणतीही योजना ही महिला व बाल विकास विभागामार्फत कार्यान्वित नाही, असे महिला व बाल विकास, पुणे विभाग पुणे चे विभागीय उपआयुक्त, यांनी दि. 10 मार्च 2021 रोजीच्या पुणे विभागातील जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांना पत्राद्वारे अवगत केलेले आहे. या मेसेजमुळे नागरीकांची फसवणूक होण्याची शक्यता लक्षात घेता, अशी कोणतीही योजना ही महिला व बाल विकास विभागामार्फत राबविली जात नसुन या मेसेजला नागरीकांनी बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती ए. एस. कांबळे यांनी केलेले आहे.
No comments:
Post a Comment