प्रसूतीसाठी महिलेकडून डॉक्टरांनी लाच घेत सोबत आलेल्या महिलेचा केला विनयभंग - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, March 20, 2021

प्रसूतीसाठी महिलेकडून डॉक्टरांनी लाच घेत सोबत आलेल्या महिलेचा केला विनयभंग

प्रसूतीसाठी महिलेकडून डॉक्टरांनी लाच घेत सोबत आलेल्या महिलेचा केला विनयभंग                                                                              जेजुरी (प्रतिनिधी): जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील पिसु्टी येथे ऊसतोड करणाऱ्या महिलेच्या प्रसुतीसाठी जेजुरी ग्रामीण रुग्णालयात १०८ रुग्णवाहिकेच्या डॉक्टरांनी पैशांची मागणी करून आठ हजार रूपांची लाच घेतली. तसेच या महिलेच्या बरोबर आलेल्या महिला नातेवाईकाचा या डॉक्टरने विनयभंग केल्याची घटना घडली असून संबधित डॉक्टरवर जेजुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सदर डॉक्टरचे नाव डॉ. प्रफुल्ल काकडे असून या आरोपीवर भा.द.वी. ४२०, ३५४ नुसार जेजुरी पोलसांनी गुन्हा दाखल केला आहे.या घटनेबाबत जेजुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि नीरे जवळील पिसु्टी येथे बिरोबा वस्तीवर रहाणाऱ्या ऊस तोड कामगार असणाच्या शीला पवार यांना डिलिव्हरी साठी दि.१३ मार्च रोजी रात्री ११ वाजता जेजुरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या सोबत त्यांची भावजय राणी बाळू चव्हाण या आलेल्या होत्या. सदर डिलिव्हरी क्रिटीकल असून बाहेरून डॉक्टरांना आणावे लागेल त्यासाठी सोळा हजार रुपयांची मागणी फिर्यादी राणी चव्हाण यांच्याकडे डॉ काकडे
यांनी केली. मात्र फिर्यादी यांची एवढी ऐपत नसल्याने दहा हजार रुपये देण्याचे ठरले. व लगेचच फिर्यादी राणी चव्हाण यांनी आठ
हजार रुपये डॉ. काकडे यांना दिले. मात्र शीला पवार यांची नॉर्मल डिलिव्हरी झाली. दुसर्या दिवशी आरोपीने राणी चव्हाण यांना उरलेले दोन हजार रुपये मागितले. ते पैसे न दिल्याच्या कारणावरून त्यांनी पेशंट शीला पवार हिच्या नवरऱ्यास भेटू दिले नाही. तसेच फिर्यादी राणी चव्हाण या रात्री ११ ते पहाटे ३ वाजेपर्यंत रुग्णालयात असताना आरोपी डॉक्टरने फिर्यादी कड़े वाईट भावनेने पाहून डोळ्याने व मानेने खुणवून संडास, बाथरूम कडे चल असा ईशारा केला. त्याकडे फिर्यादीने लक्ष दिले नाही अशा वेळी आरोपी डॉक्टरने या महिलेचा हात धरून तिला ओढत नेहण्याचा प्रयत्न करून विनय भंग केला असल्याची फिर्याद राणी चव्हाण यांनी जेजुरी पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आले.अधिक तपास चालू आहे.

No comments:

Post a Comment