*देसाई इस्टेट मधील महिलांच्या वतीने तेजस पांढरे चा सन्मान*
बारामती:-केंद्रीय लोकसेवा आयोग च्या (MPSC) परिक्षे मध्ये उत्तीर्ण होऊन CAPF हे पद मिळवून देशात 46 वा रँक मिळवलेला देसाई इस्टेट मधील तेजस पांढरे याचा सत्कार श्री गणेश तरुण मंडळ व राजे छत्रपती प्रतिष्ठान आणि देसाई इस्टेट मधील महिला ग्रुप च्या वतीने करण्यात आला. या प्रसंगी सौ अनिता घुले,सौ स्वाती नवसारे,सौ अरुणा हेडे, सौ सुजाता सूर्यवंशी,सौ मनीषा निकम,सौ प्रमिला रणनवरे,सौ आरती नवसारे,सौ गौरी सावळेपाटील,सौ पदमाजा खताळ,सौ मंदा गवारे,सौ वंदना वाघ,सौ सुजाता जगदाळे,सौ शारदा मोहिते व श्रीमती पुतळाबाई ठोंबरे आदी महिला उपस्तीत होत्या. देसाई इस्टेट मधील शिक्षक दाम्पत्य श्री सुरेश पांढरे व संगीता पांढरे यांचे चिंरजीव तेजस असून " रहिवासी माता भगिनी,ज्येष्ठ,तरुण वर्ग सर्वांनी निवडी बदल केलेला सत्कार नेहमी जीवनात सकारत्मक ऊर्जा देईल व घरचा सत्कार म्हतपूर्ण असून आई वडील,शिक्षक व देसाई इस्टेट चे नाव नेहमी उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करेल " असे प्रतिपादन तेजस पांढरे यांनी दिले.कार्यक्रमाचे आयोजन हेमंत भाऊ नवसारे, राहुल वायसे यांनी केले होते या वेळी ,डॉ ज्ञानेश्वर घुले,श्यामराव मोहिते,बापूराव जगदाळे,श्री सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्तीत होते. सर्वांचे आभार हेमंत(भाऊ ) नवसारे यांनी मानले
No comments:
Post a Comment