बारामती शहर व तालुक्यातील विनापरवाना बेकायदेशीर केमिकलयुक्त ताडी विक्री बंद होत नसल्याने आमरण उपोषण
बारामती:-प्रशासकीय भवन समोर चालू असणाऱ्या उपोषण दरम्यान राहुल महादेव सोन्ने यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की पुणे जिल्ह्यातील विनापरवाना केमिकलयुक्त ताड़ी विक्री बंद करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क यांना अनेक वेळा पत्रव्यवहार केला आहे मात्र त्यानी कोणतीही दखल घेतली नाही.
पुणे जिल्ह्यासह बारामती तालुक्यातील परवाने धारक ताडी विक्रेते केमिकल युक्त ताडी विकत असल्याचे व त्याचे होणारे दुष्परिणाम आम्ही राज्य उत्पादन शुल्क अधिकारी यांना पटवून दिल्यानंतर त्यांनी अशा व्यावसायिकांवर कारवाई करून सर्व परवाने रद्द
केले... मात्र हेच अधिकारी सध्या या व्यावसायिकांकडून मोठी रक्कम घेऊन व्यवसाय
चालविणेस साथ देत आहेत. या केमिकल युक्त ताडीमुळे अनेक तरुणांचे जीव गेले
आहेत. अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. शासन याबाबत कोणतीही ठोस कारवाई करीत नसल्याने मी सोमवार दिनांक 22 मार्च 2021 पासून खालील कारणाने आमरण
उपोषणास बसत आहे.बारामती शहर व तालुक्यातील विनापरवाना केमिकलयुक्त ताडी दुकाने बंद होणे बाबत.
2) बारामती शहर व तालुक्यातील तरुणांचे अवैद्य केमिकलयुक्त ताडी पिल्याने मृत्यू झाले आहेत त्या तरुणांची माहिती घेऊन कुटुंबीयांना शासनाच्या वतीने पाच लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी.
3) बेकायदेशीर केमिकलयुक्त ताडी विक्रेत्यांना मदत करणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क अधिकार्यांवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी. वरील कारणांमुळे मी आमरण उपोषणास
बसत आहे तरी आपण याची दखल घ्यावी.
4) गुजरात मध्ये केमिकलयुक्त विषारी ताडी सापडल्यानंतर त्या आरोपीला किमान
पाच वर्षाची शिक्षा आहे असा कायदा लागू आहे तो कायदा महाराष्ट्रामध्ये लागू
करावा असे पत्राची प्रत पालकमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य .
मा . ना . दिलीप वळसे पाटील राज्य उत्पादन शुल्क मंत्री .मा . ना . आमदार देवेंद्रजी फडणवीस विरोधी पक्ष नेते,मा . आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई ,मा . जिल्हा अधिकारी पुणे ,मा . पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण ,मा . राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक पुणे ,मा . प्रांत अधिकारी बारामती यांना देण्यात आल्याचे सांगितले यावेळी राहुल सोन्नै, प्रवीण झांबरे, संतोष नेवसे,सदिप भिसे, महेश चौबे या उपोषणात सहभागी झाले होते
No comments:
Post a Comment