अपहरणाचा तपास लागत नाही तोच लाखो रुपये व दागिने चोरल्याची घडली घटना... बारामती:-बारामतीत गुन्हेगारी वाढत असल्याचे काही दिवसांपासून दिसत आहे,अश्या अनेक वेगवेगळ्या घटना घडत असतानाच नुकताच आणखी एक घटना घडली, बारामती शहर पोस्ट गु.र. नं.-174/2021 भा द वि. क 394,34 नुसार फिर्यादी सौ. प्रमिला भाऊसाहेब भालेराव वय 42 वर्षे व्यवसाय घर काम राहणार फलटण रोड भालेराव गॅरेज पाठीमागे कसबा तालुका बारामती जिल्हा पुणे यांनी तक्रार दाखल केली त्यानुसार अज्ञात दोन चोरटे यांनी चोरी केल्याचे सांगितले, दि 14/03/2021 रोजी चे दुपारी 03.00वा ते 3,30 व चे दरम्यान मौजे बारामती गावच्या हद्दीत कसबा फलटण रोड भालेराव गॅरेज च्या मागे राहते घरातुन 1) 6,50,000/- रोख रक्कम 2000 दराच्या व 500 रुपये दराच्या नोटा 2)1,50,000/- रुपये किमतीचे सोन्याचे पट्टीचा गंठण तीन तोळे वजनाचा माल यातील 2 अज्ञात इसमांनी फिर्यादीचे उघडे घरामध्ये दरवाजातून आत प्रवेश करून फिर्यादी झोपली असलेल्या टीव्ही रूम मध्ये जाऊन त्यातील एकाने फिर्यादीचे उजवे दंडाला हाताने हलवून जागे करून पैसे कुठे ठेवले आहेत दे त्यावर फिर्यादी यांनी कसले पैसे असे म्हणून मोठा आवाज केला असता बेडरूम मध्ये झोपलेली फिर्यादी ची सून काजल ही बेडरूम मधून बाहेर आली असता त्यातील एका इसमाने त्याचे बुटांमध्ये ठेवलेला सुरा काढून फिर्यादीची सुन हिचे गळ्याला लावून पैसे आणि घरातील दागिने दे नाहीतर तुझे सुनेला खलास करील असा दम दिल्याने फिर्यादीने कपाटात ठेवलेले वरील वर्णनाचे दागिने व रोख रक्कम काढून त्यातील एका इसमाच्या हातात दिले त्याने तो माल एका शाख मध्ये टाकून शाख पाठीला अडकून सुनेला ढकलून देऊन घरातून बाहेर निघून फलटण बाजूकडे पळून गेले आहेत वगैरे फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर पो ना थोरवे यांनी दाखल केला असून तपास अंमलदार सपोनि पालवे हे पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे
बारामती शहर यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहे
No comments:
Post a Comment