बारामती:- राष्ट्रीय समाज पक्ष बारामती तालुक्याच्या वतीने उपकार्यकारी अभियंता महावितरण कंपनी बारामती ग्रामीण यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले पाठीमागच्या आठवड्यामध्ये आम्ही याच कार्यालयात उपकार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले होते की तुम्ही शेतकऱ्यांचे वीज बिल भरले नाही म्हणून कनेक्शन कट करताय तसेच डीपी सोडवत आहे ते काम तात्काळ थांबवावे परंतु यांनी त्या निवेदनाची दखल न घेता वीज कनेक्शन तोडण्याचा व डीपी सोडवण्याचा कार्यक्रम चालूच ठेवला नाईलाजास्तव आज आम्हाला त्यांच्या कार्यालयाबाहेर हे आंदोलन करण्याची वेळ आली आमचे एवढेच म्हणणे आहे शेतकऱ्याचा शेतातील हाता तोंडाशी आलेली पीके आपल्या वीज कनेक्शन तोडण्याने पाणी देणे अवघड झालेले आहे, त्याची पीके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत अगोदर कोरोणाच्या महामारीत शेतकरी पुर्ण पणे मोडखळीस आलेला आहे आणी त्यात हे महावितरन अशा पध्दतीने काम करत आहे, लवकरात लवकर आपण विज कनेक्शन तोडणी थांबवावी व DP सोडवीणे बंद करावे अन्यथा राष्ट्रीय समाज पक्ष संपुर्ण महाराष्ट्र उग्र स्वरूपाचे आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला त्या संदर्भात आज उपकार्यकारी अभियंता यानी आंदोलनास भेट देऊन तुमच्या मागण्या सरकार दरबारी पोहचवू असे अश्वासण दिले या वेळी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष संदिप चोपडे,तालुका अध्यक्ष अँड.अमोल सातकर ,जिल्हा प्रभारी किरण गोफणे, सतीश शिंगाडे,किसण हंडाळ,लखण कोळेकर, शैलेश थोरात,विठ्ठल देवकाते, महादेव कोकरे,काकासाहेब बुरूंगले,चंद्रकांत वाघमोडे,तानाजी मारकड, कमलैश हिरवे, किशोर सातकर,निखील दांगडे तुषार गुलदगड, अण्णा पांढरे,आदी कार्यकर्ते उपस्थित होते...
Post Top Ad
Wednesday, March 24, 2021
Home
ताज्या घडामोडी
बारामती
राष्ट्रीय समाज पक्ष बारामती तालुक्याच्या वतीने विज कट करू नये यासाठी महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
राष्ट्रीय समाज पक्ष बारामती तालुक्याच्या वतीने विज कट करू नये यासाठी महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment