*बारामतीत कांशीराम जयंती उत्साहात साजरी*
बारामती,दि.१५ : बहुजन समाज पक्षाचे संस्थापक मान्यवर कांशीरामजी यांची जंयती शहरातील भिमनगर येथील समाज मंदिरा मध्ये बहुजन समाज पक्षाच्या बारामती विधानसभेच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.तर बहुजन समाज पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी काळुराम चौधरी यांनी आपल्या भाषाना मधून मान्यवर कांशीरामजी यांचा जीवनपट उलगडून त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला.
यावेळी बोलताना चौधरी म्हणाले कि "ज्या जातील ज्या जमातीला बैलगाडीत बसू दिल जात नव्हत त्या जातील त्या जमातीला लालदिव्याच्या गाडीत बसवण्याचं काम मान्यवर कांशीराम साहेबांनी केलं आहे" त्याच सोबत 'राजकारण चालेल न चालेल,सरकार बनेल न बनेल पण कोणत्याही परिस्थितीत सामाजिक परिवर्तनाची गती थांबली नाही पाहिजे' या मान्यवर कांशीरामजी यांच्या विधानाचा दाखला देत येणाऱ्या काळात आपल्याला सामाजिक परिवर्तनाची गती वाढविण्याच्या दिशेने पाऊले टाकणे गरजेचे असल्याचे मत देखील यावेळी चौधरी यांनी व्यक्त केले.
दरम्यान,या कार्यक्रमाला जिल्हा सचिव,बाळासाहेब पवार, राहुल साबले जयेश गुळवे,इसाक पठाण,विशाल घोरपडे,मयूर केंगार यांच्यासह आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते
No comments:
Post a Comment