रिपब्लिकन पक्षाच्या वतीने बारामती नगर परिषदेसमोर आंदोलन.... बारामती- शहर व तालुक्यामधील समाज बांधव व अण्णाभाऊ समर्थकांची अनेक वर्षाची मागणी आसणारी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती स्वतंत्र पुतळा वा स्मारक बारामती नगरपालिकेच्या जागेत
स्वतंत्रपणे उभारावा तसैच काही महत्वाच्या मागण्यांसंदर्भात रिपब्लिकन पक्षाच्या वतीने बारामती नगर परिषदेसमोर तीव्र स्वरूपाचे लक्षणीय आंदोलन करण्यात आले. रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सचिव सुनील शिंदे,
शहराध्यक्ष अभिजीत कांबळे, तालुका सरचिटणीस संजय वाघमारे, महिला जिल्हा कार्याध्यक्ष रत्नप्रभा साबळे यांच्या नेतृत्वाखाली सदरील आंदोलन करण्यात आले.
आंदोलनानंतर निवेदनातील मागण्यांसंदर्भात सात दिवसात निर्णय घेऊन कळवू असे आश्वासन मुख्याधिकारी किरणराज यादव यांनी रिपब्लिकन
शिष्टमंडळाला पत्राद्वारे दिल्यानंतर सदरील आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात
आले, जनतेच्या असणार्या न्याय्य मागण्यांकडे नगरपालिका प्रशासनाने गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन मागण्या मान्य कराव्यात अन्यथा मागण्यांची दखल न घेतल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारणार असल्याचा इशारा रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी यांच्याशी बोलताना दिला.महिला आघाडी शहराध्यक्ष पुनम घाडगे, शहर संपर्क प्रमुख निलेश जाधव,उपाध्यक्ष रोहित सोनवणे, युवाअध्यक्ष उमेश शिंदे, तालुका कार्याध्यक्ष माऊली कांबळे, महिला युवती अध्यक्ष सविता खंडाळे, शारदा झुरांगे, आबा गावडे,
अमोल कांबळे , प्रविण नलवडे, सुशील कांबळे, ओमकार माने, गणेश जाधव आदीं रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सदरील आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. आंदोलकांनी गगनभेदी घोषणा देऊन
नगरपालिका परिसर दणाणून सोडला कोरोना पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स आदी उपाय योजनां करून सदरील आंदोलन करण्यात आले मागण्ययासंदर्भात आम्ही सातत्याने बारामती नगरपालिकेकडे पाठपुरावा करीत असताना नगरपालिका प्रशासन या बाबीकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्यामुळे नाइलाजास्तव आम्ही नगरपालिका समोर एक दिवशीय तीव्र लक्षणे आंदोलन करीत आसल्याचे सदरील निवेदनात म्हटले आहे. .*सदरील निवेदनातील मागण्या खालीलप्रमाणे...* साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाधाऊ साठे यांचे पूर्णकृती व स्वतंत्र जागेत पुतळा सर्वे नंबर 1 अ वार्ड क्रमांक 15, पवार
बंगल्याच्या मागे गार्डन आरक्षण जागेत करावे उभारावे. 2) থहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत इमारत तात्काळ उद्धघाटन करून त्वरित नागरिकांना बांधून देण्यात यावी.3) डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम है सर्वसामान्य
नागरिकांना खुले करण्यासाठी नगरपालिकेने त्वरित आपल्या स्वतःच्या ताब्यात घ्यावे या ठिकाणी श्री धीरज जाधव यांच्याकडून ते त्वरित काढून घेण्यात यावे. ४) बा न प सेवेत असणारे नगर रचनाकार व व सहाय्यक नगररचनाकार हे आपल्या कामात व कर्तव्यात निष्काळजीपणा दाखवून अनेक बांधकामांना अभय देत असल्यांचे निदृर्शनास आले असून आम्ही अनेक तक्रारीकडे त्यांचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याने त्याच्यावर त्वरित कारवाई कारवाई करावी, त्यांची बदली करावी अथवा त्यांचे निलंबन करावे*अश्या मागणीचे निवेदन देण्यात आले.
No comments:
Post a Comment