राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार ब्रीच कॅडी रुग्णालयात दाखल मुंबई:-राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांना ब्रीच कॅडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पित्ताशयाचा त्रास असल्यामुळे पोटात दुखू लागल्याने त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी या संदर्भात
ट्विट केले आहे.शरद पवार यांना अचानक पोटात दुखू लागल्याने त्यांची नियमित तपासणी करण्यात आली.त्यामध्ये त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याचे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान यासंदर्भात 31 मार्च रोजी रूग्णालयात पुन्हा एकदा पवार यांना दाखल करण्यात येणार असून, त्यांची छोटीशी शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती मलिक यांनी दिली.दरम्यान पवार यांनी त्यांचे पुढील सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केले आहेत.असे सांगण्यात आले.
No comments:
Post a Comment