विधीमंडळात निर्णय होईपर्यंत कृषीपंप वग्राहकांची वीजजोडणी तोडूनये - उपमुख्यमंत्री अजित पवाट यांचे निर्देश,...भाजप आमदार राम सातपुते नी केली होती मागणी... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, March 1, 2021

विधीमंडळात निर्णय होईपर्यंत कृषीपंप वग्राहकांची वीजजोडणी तोडूनये - उपमुख्यमंत्री अजित पवाट यांचे निर्देश,...भाजप आमदार राम सातपुते नी केली होती मागणी...

विधीमंडळात निर्णय होईपर्यंत कृषीपंप व
ग्राहकांची वीजजोडणी तोडू
नये - उपमुख्यमंत्री अजित पवाट यांचे निर्देश,...भाजप आमदार राम सातपुते नी केली होती मागणी...
                                                            मुंबई:-वीजतोडणी तात्काळ थांबवण्यास सांगण्यात आले,शेतकर्यांचे कृषीपंप आणि वीज ग्राहकांच्या थकबाकीसंदर्भात विधीमंडळात चर्चा होऊन निर्णय होईपर्यंत कुणाचीही वीजजोडणी तोडू नये, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिले. उपमुख्यमंत्र्यांच्या विधीमंडळातील निर्देशानंतर संबंधीत यंत्रणांना वीजतोडणी तात्काळ थांबवण्यास सांगण्यात
आले आहे.विधीमंडळ अधिवेशनाच्या दुसर्या दिवशी विधानसभेत  थकबाकीसंदर्भात  उपस्थित मुद्याला उत्तर देताना, उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, वीजबिलांच्या थकबाकीसंदर्भात
विधीमंडळात चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे. चर्चा होऊन दोन्ही बाजूंच्या सभासदांचे समाधान होईपर्यंत राज्यातील कृषीपंप
आणि ग्राहकांची वीज जोडणी तोडण्यात येणार नाही. राज्यातील वीजथकबाकीसंदर्भात विशेष बैठक आयोजित करुन चर्चा करण्याची सरकारची तयारी असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.उपमुख्यमंत्र्यांच्या या निर्देशाबद्दल विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले असले तरी अधिवेशन चालू होण्या अगोदर भाजप आमदार राम सातपुते व सहकारी यांनी विजबिल माफीसाठी चांगलाच आवाज उठविला होता  व याबाबत भाजप च्या वतीने सभागृहात मुद्दा उपस्थित झाला होता.

No comments:

Post a Comment