बारामतीतील स्वयंभू सोमेश्वर मंदिर महाशिवरात्री दिवशी भाविक दर्शनासाठी बंद... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, March 8, 2021

बारामतीतील स्वयंभू सोमेश्वर मंदिर महाशिवरात्री दिवशी भाविक दर्शनासाठी बंद...

बारामतीतील स्वयंभू सोमेश्वर मंदिर महाशिवरात्री दिवशी भाविक दर्शनासाठी बंद...

सोमेश्वरनगर वार्ताहर:- बारामती तालुक्यातील  प्रसिद्ध स्वयंभू सोमेश्वर मंदिर दि.११ रोजी महाशिवरात्र निमित्त भाविकांना दर्शनासाठी बंद राहणार आहे. अशी माहिती देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष प्रताप भांडवलकर व सचिव राहुल भांडवलकर यांनी बोलताना दिली  . 

कोव्हीड १९ विषाणुचा प्रादुर्भाव रोखणेसाठी प्रतिबंधात्मकउपाय योजनांच्या अनुषंगाने सोमेश्वर करंजे ता.बारामती येथील भाविकांच्या दर्शनासाठी बंद....

याबाबत वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे  सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी दि ५ रोजी तहसील कार्यालयाला याबाबत पत्र पाठवले होते.  तसेच  बारामतीचे तहसीलदार विजय पाटील यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, कोरोना विषाणुमुळे संसर्ग वाढत असल्याने प्रतिबंध व नियंत्रण यासाठी जिल्हाधिकारी यांना त्यांचे कार्यक्षेत्रात सक्षम प्राधिकारी म्हणुन घोषित केले आहे. आणि ज्या अर्थी  सोमेश्वर करंजे ता.बारामती जि.पुणे येथील स्वयंभू सोमेश्वर मंदिर हे महाराष्ट्र शासन पर्यटन विभाग, ब वर्ग दर्जाचे तिर्थक्षेत्र असणारे सोमेश्वर मंदिर येथे दरवर्षी महाशिवरात्री दिवशी संपुर्ण महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहुन भाविक भक्त देवदर्शनाकरिता येत असतात व तेथे भाविकांची हजारोच्या संख्येत गर्दी होत असते तसेच गुरुवारी दि.११/०३/२०२१ रोजी महाशिवरात्री असल्यामुळे  महाराष्ट्रच्या कानाकोपऱ्यातुन  येणाऱ्या भाविकांमध्ये कोरोना विषाणुचा प्रसार होऊ  नये या दृष्टीने सोमेश्वर मंदिर गुरुवारी दि.११/०३/२०२१ रोजी भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले  आहे.
       शिव भक्तांनी घरी सुरक्षित राहून कुटूंबाची काळजी घ्यावी व आपल्या कुटूंबा समवेत शिव दर्शन घरीच राहून घ्यावे असे विनम्र अवाहन     देवस्थानचे अध्यक्ष प्रताप भांडवलकर यांनी केले आहे ....

No comments:

Post a Comment