*काकडे यांच्या " कथा वास्तवातल्या " प्रकाशनापुर्वीच गाजल्या* :
बारामती:-विद्या प्रतिष्ठानच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील कथा लेखक प्रा. विजय काकडे यांचे नविन पुस्तक " कथा वास्तवातल्या " हे प्रकाशन होण्याआधीच गाजले. प्रा. काकडे यांनी केलेल्या प्रकाशन पुर्व नोंदणी आवाहनाला वाचकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. अगदी तीनच दिवसात दोनशे प्रति विकल्या गेल्या.
लॉकडाऊनच्या काळात प्रा. काकडे हे सोशल मिडियावर सातत्याने कथा, कविता, चारोळी, लेख इत्यादीच्या माध्यमातून प्रबोधन करीत होते. संपूर्ण महाराष्ट्रातील वाचक त्यांच्या साहित्याचे भरपूर कौतुक करीत असतात. या काळात त्यांना विशाखा फाउंडेशन तर्फे कोविड योद्धा या पुरस्काराने व ६ राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलेले आहे.
प्रा. विजय काकडे हे शब्दवेल या व्हॅट्सप समूहावर दर शनिवारी " वास्तव " या ज्वलंत विषयावर नियमितपणे लघुकथेच्या माध्यमातून स्तंभलेखन करीत असतात. त्यापैकी पहिल्या २२ आठवड्यातील कथांमधून " कथा वास्तवातल्या भाग-१ " हा कथासंग्रह तयार झाला आहे.या कथांचे प्रकाशन पालघर येथील रंगतदार प्रकाशनने केले आहे. पुस्तकाचे सुंदर व लक्षवेधी मुखपृष्ठ पालघरचेच कलाशिक्षक श्री. विजय जोगमार्गे यांनी साकारले आहे. तर नाशिकचे साहित्यकणा फाउंडेशनचे अध्यक्ष व सुप्रसिद्ध कथाकार संजय द गोराडे यांची प्रस्तावना लाभली आहे.
कोरोनाची गंभीर पार्श्वभूमी लक्षात घेता प्रा. काकडे यांनी प्रकाशनाचा भव्यदिव्य कार्यक्रम टाळून प्रत्यक्ष वाचकांपर्यंत हा कथासंग्रह पोहोचविण्याचे ठरविले आहे. यामुळेच त्यांच्या या कृतीचे व साहित्यकृतीचे समाजाच्या सर्व थरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे, उपप्राचार्य डॉ. लालासाहेब काशीद, डॉ. शामराव घाडगे, प्रा. अंकुश खोत, सौ. उत्कर्षा ठाकरे या मान्यवरांनी काकडे यांच्या ग्रंथाचे स्वागत व अभिनंदन करून काकडे यांना पुढील वाटचलीस शुभेच्छा दिल्या.
No comments:
Post a Comment