बनावट दस्तऐवज तयार करून फसवणूक केल्याच्या प्रकरणात नगररचना सह संचालक नाझीरकरला अटक - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 23, 2021

बनावट दस्तऐवज तयार करून फसवणूक केल्याच्या प्रकरणात नगररचना सह संचालक नाझीरकरला अटक

बनावट दस्तऐवज तयार करून फसवणूक केल्याच्या प्रकरणात नगररचना सह संचालक नाझीरकरला अटक
 पुणे : बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यातील दस्तऐवज तयार करून फसवणूक केल्याच्या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने नगररचना विभागातून निलंबित केलेले सह संचालकास हनुमंत जगन्नाथ नाझीरकर (वय 55, रा. स्वप्नशिल्प सोसायटी कोथरूड)
यांना अटक केली आहे. या अटकेने शिक्षण
क्षेत्रात खळबळ उडाली आहे.बनावट याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात भादवि कलम 417, 467, 468 नुसार गुन्हा दाखल आहे. दरम्यान यापूर्वी देखील हनुमंत नाझीरकर यांच्यावर पुण्यातील दत्तवाडी,आलंकार आणि नवी मुंबई पोलिसांकडे गुन्हे दाखल आहेत.बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
झाल्यानंतर नाझीरकर हे पसार झाले होते. गेल्या
एक महिन्यापासून गुंगारा देत होते. त्यामुळे त्यांचा युद्ध पातळीवर शोध घेतला जात होता.यादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेला नाझीरकर हे
महाबळेश्वर परिसरात असल्याचे समोर आले.
त्यानुसार पथकाने त्यांना अटक केली आहे.त्यांना पुढील तपासासाठी बारामती पोलिसांकडे देण्यात आले आहे. दरम्यान अटकेसाठी सातारा जिल्ह्यातील अनेक ठिकाणांचे सीसीटीव्ही
तपासले होते, पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ
निरीक्षक पद्माकर घनवट, सहाय्यक निरीक्षक सचिन काळे, उपनिरीक्षक रामेश्र्वर धोंडगे तसेच कर्मचारी दत्तात्रय गिरमकर, अनिल काळे,रविराज कोकरे, उमाकांत कुंजीर जनार्दन
शेळके, प्रमोद नवले, सचिन गायकवाड, राजू मोमीन, अजित भुजबळ, मंगेश थिगळे, महेंद्र कोरवी यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

No comments:

Post a Comment