बारामती शहर पोलिसांनी केली हातभट्टी दारूवर कारवाई.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, March 29, 2021

बारामती शहर पोलिसांनी केली हातभट्टी दारूवर कारवाई..

बारामती:-बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीत जळोची ते मोतीबाग कडे जाणारे ओढ्याच्या कडेला इसाक बागवान यांचे क्षेत्राचे कंपाऊंड लगत ओढ्याचे बाजूस काटेरी झुडपात इसम नाव अमोल उर्फ बापू रंदवे हा सार्वजनिक ठिकाणी  अवैद्य रित्या शासकीय जमीन क्षेत्राचे जागेत जमीन खोदून  गावठी हातभट्टीची दारू काढण्याकरता भट्टी लावून  दारू काढत आहे अशी बातमी मिळताच सदर ठिकाणी  रेड केली असता सदर ठिकाणी खालील प्रमाणे प्रोहिबिशन गुन्ह्याचा मुद्देमाल मिळून आला
1)60000/- रु किमतीचा 500 लिटर मापाचे 06 प्लास्टिक ब्यारल त्यात 3000 लिटर रसायन जु वा की अ
2)7500/-रु किमतीचा 35 लिटर मापाचे प्लास्टिक 03 कॅड त्यात 105 लिटर तयार दारू जु वा की अ
3)4000/- रु किमतीचा नवसागर चे 02 बॉक्स गा ह भ दारू तयार करण्यासाठी जु व की अ
4)5000/- रु किमतीचा अंदाजे 3 मन सरपण भट्टी पेटवन्याकर्ता
5)5000/- रु किमतीचा 200 लिटर मापाचे 02 लोखंडी ब्यारल भट्टी वर लावलेल जु व की अ
 81500/- येणेप्रमाणे किमतीचा प्रोबिशन मुद्देमाल मिळून आला तो जागीच नाश केला असुन गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

No comments:

Post a Comment