बारामती कृषि विभागामध्ये जागतिक महिला दिन कार्यक्रम संपन्न
बारामती दि.08 :- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्रशासकीय इमारत बारामती येथील कृषि भवनमध्ये जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम आज पार पडला.
या कार्यक्रमासाठी निवडणूक नायब तहसिलदार श्रीमती पी.डी.शिंदे, पोलीस उपनिरिक्षक श्रीमती भोईटे , आहार तज्ञ मोनाली थोरात, तंत्र अधिकारी श्रीमती सुप्रिया शिळीमकर , कृषि अधिकारी श्रीमती निगडे, कृषि अधिकारी श्रीमती कारंडे , सौ. ताटे तसेच प्रशासकीय इमारतीमधील सर्व शासकीय कार्यालयातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या कार्यक्रमावेळी सर्व उपस्थित महिलांना पोलीस उपनिरिक्षक श्रीमती भोईटे यांनी निर्भया पथकाविषयी माहिती देवून त्या म्हणाल्या की, महिलांनी समाजामध्ये वावरतांना त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाविरूध्द शांत न राहता आवाज उठविला पाहिजे. कोणतीही अडचण आल्यास निर्भया पथकास तात्काळ संपर्क साधावा. पोलीस विभाग नेहमीच महिलांच्या अडी अडचणी सोडविण्यासाठी तत्परतेने उभा आहे. तसेच श्रीमती मोनाली थोरात या आहारविषयक माहिती देतांना म्हणाल्या की, महिलांनी दर तीन महिन्याला रक्त तपासणी करणे गरजेचे आहे. शरीरामधील हिमोग्लोबिनचे प्रमाण 12 टक्के असणे गरजेच आहे. त्या करीता सर्व महिलांनी सकस आहार घेणे तसेच नियमित प्राणायाम , योगा, व्यायाम करणे अतिशय गरजेचे आहे. शरीराला गरजेचे असणारे व्हिटामीन मिळण्याकरीता पौष्टिक पदार्थाचे सेवन करणे आवश्यक आहे. तसेच निरोगी आरोग्यासाठी स्वत:च्या स्वच्छतेची देखील काळजी घेणे गरजेचे आहे. दिवसातील कमी कमी एक तास स्वत:च्या आरोग्याकरीता देणे आवश्यक आहे. असे सांगून त्यांनी सर्व उपस्थित महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
No comments:
Post a Comment