कोरोनाचे सावट असताना कर्जदारांना त्रास देऊ नये व वसुली थांबवावी... बारामती:- तहसिलदार बारामती व सहाय्यक निबंधक ,सहाय्यक सहकारी संस्था बारामती ता.बारामती यांना निवेदन देण्यात आले,बारामती तालुक्यातील सर्व कर्जदारांचे कोव्हीड-१९ संपेपर्यंत कर्ज फेडण्याचे हप्ते वाढविण्याचे व कर्जदारांकडून कर्ज वसुलीसाठी त्रासदेण्याचे बंद करण्याचे नागरी पतसंस्था, सहकारी पत संस्था,
फायनान्स बॅक व लायसन्स धारक सावकार,सोसायटया व इतर कर्ज देणा-या सर्व संस्था यांना आदेश करण्याबाबत सूचना कराव्यात,तसेच जनसामान्याच्या व्यथा लक्षात घेऊन आपल्या कार्यालयाकडे लेखीस्वरूपात अर्ज वजा निवेदन करतो की,कोरोना विषाणुच्या जागतिक संकटामुळे प्रत्येक नागरीकांचे कार्यशक्ती वर प्रतीकुल परिणामा झाला आहे. जे कर्जदार यापुर्वी प्रामाणिक पणे व नियमीतपणे कर्ज परत होते त्यांना कर्ज परत फेड करण्याची इच्छा असून ही सध्याच्या परिस्थतीमुळे परत फेड करणे शक्य होत नाही. याबाबत सहानुभूपुर्वक विचार करावा. व सहकारी बॅक ,नागरी पतसंस्था नागरी बिगर शेती पतसंस्था, लायसन्स धारक सावकार,फायनान्स ,सोनार ,इतर सर्व कर्जावर दंड व्याज आकारणे तसेच आधिक शुल्क आकारणे तसेच जमिनींचा लिलाव काढणे , नोटीसा देणे हे सर्व प्रकार थांबवण्याचे आदेश सर्व कर्ज वाटप संस्थांना व बँकांना यांना करण्यात यावे असे निवेदन सजीव संरक्षण आणि जागृती बहुउद्देशीय सामाजिक संस्था, महाराष्ट्र , भारत चे अध्यक्ष भालचंद्र महाडिक यांनी दिले.
No comments:
Post a Comment