दोन दिवसात रेमडेसिवीर इंजेक्शन्सच्या 13257 व्हायल्स पुण्यातील रुग्णांना वितरीत
पुणे:-दिनांक 21/04/2021 व 22/04/2021 रोजी पुणे जिल्हयातील एकुण 828 कोविड हॉस्पीटल्समध्ये असलेल्या 21781 फंक्शनल बेडसच्या प्रमाणात दिनांक 21/04/2021 रोजी 6857 व दिनांक 22/04/2021
रोजी 6400 इंजेक्शन असा एकुण 13257 इंजेक्शनसचा पुरवठा हॉस्पीटलसला स्टॉकिस्ट मार्फत करण्यात आला आहे.
दिनांक 16/04/2021 पासून रेमडेसिवीर इंजेक्शनचा उपलब्ध साठा देनंदीन तत्वावर सर्व रुग्णालयांना समान तत्वावर वाटप करण्यात येत आहे. जेणेकरुन सर्व कोविड हॉस्पीटलमध्ये त्यांचे रुग्णांना थेट साठा उपलब्ध होईल. पुणे जिल्हयातील रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा विचारात घेता जिल्हाधिकारी कार्यालय पुणे
येथे दि.11/04/2021 पासुन 24 x 7 रेमडेसिवीर नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.रेमडेसिवीरचा काळाबाजार रोखणेचे अनुषंगाने शहरी भागात 6 भरारी पथके व ग्रामीण भागात 12 भरारी पथके तहसिलदार
यांचे नियंत्रणाखाली स्थापना करण्यात आली असून त्यांचे मार्फत रुग्णालये, स्टॉकिस्ट व वितरक यांचेकडील रेमडेसिवीरची उपलब्धता व सुरयोग्य वापर यावर नियंत्रण ठेवणेत येत आहे.
आरोग्य विभागाचे निर्देशानुसार गरजु रुग्णांना या इंजेक्शनचा वापर करावा, असे सर्व रुग्णालयांना
निर्देश सहा.आयुक्त अन्न व औषध प्रशासन यांच्या कडून देण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment