धक्कादायक प्रकार.. ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्याने 22 रुग्ण दगावल्याची माहिती? नाशिक : महाराष्ट्र राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे.रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना शेकडो रुग्णांना व्हेंटिलेटर, ऑक्सिजनची गरज भासत आहे. असे असताना दुसरीकडे नाशिकमध्ये अर्धा तास ऑक्सिजन पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे 22 रुग्ण दगावल्याची माहिती पुढे आली आहे.नाशिक पालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात हा प्रकार घडला. या रुग्णालयात ऑक्सिजन टँक लीक झाला होता. त्यामुळे सर्वत्र गॅस पसरला
होता. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. या रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांपैकी 171जण ऑक्सिजनवर आहेत. तर 67 रुग्ण
व्हेंटिलेटरवर आहेत. यातच रुग्णालयातील ऑक्सिजन टँक लीक झाल्याने तब्बल अर्धा तास ऑक्सिजन पुरवठा विस्कळीत झाला होता.यादरम्यान 22 रुग्ण दगावल्याची प्राथमिक
माहिती समोर आली आहे. हा लीक झालेला
ऑक्सिजन टँक 20 KL क्षमतेचा असल्याचे
सांगण्यात येत आहे.दरम्यान, अनेक कोरोनाबाधित रुग्ण ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड्स मिळत नसल्याने दगावत आहेत. तर नाशिकमध्ये ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्याने 22 रुग्ण दगावले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र,पालिकेच्याच रुग्णालयात हा प्रकार घडल्याने चर्चेला उधाण आले आहे.
No comments:
Post a Comment