कोऱ्हाळे बुद्रुक - (प्रतिनिधी):-भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती कोऱ्हाळे बुद्रुक मधील समता नगर येथे साधेपणाने वृक्षारोपण करत साजरी करण्यात आली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम पाळत जयंती साजरी करण्यात आली. यावेळी समता नगरच्या स्वागत फलकाचे अनावरण बारामती पंचायत समितीचे गटनेते प्रदीप धापटे व सरपंच रवींद्र खोमणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी निवासी नायब तहसीलदार नामदेव काळे, पोलीस पाटील शरद खोमणे, बारामती तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हेमंत गडकरी, ग्रामपंचायत सदस्य मोहन भगत, राहुल भगत, राजू शेख, सुनील खोमणे, मस्कु चव्हाण, सुखदेव चव्हाण यांसह समता नगर येथील बौद्ध युवक संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी समता नगर येथील स्मशाभूमीत मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले व बौद्ध विहारात पुजापाठचा कार्यक्रम पार पडला.
यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात ही आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सरपंच रवींद्र खोमणे यांनी प्रतिमांना पूजन केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
त्यानंतर गावातील कै. नामदेवराव पाटील सार्वजनिक वाचनालय येथे ही जयंती पार पडली. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश खोमणे, सरपंच रवींद्र खोमणे, ग्रंथपाल अनिल चव्हाण, सचिन खोमणे, प्रतीक चव्हाण, शुभम खोमणे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment