*शासकीय रुग्णालय मध्ये कोरोना बाधित गर्भवती महिलांना स्वतंत्र प्रसूती कक्ष सोय करावी - कल्याणी वाघमोडे*
बारामती:-गेले वर्षभरा पासून कोरोनाचा महाराष्ट्रात कहर वाढताना दिसतच आहे. महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणा वर ताण आलेला दिसत आहे.
बारामती येथे महिला शासकीय ग्रामीण रुग्णालय आहे. या ठिकाणी तालुक्यातील व बाहेरील आसपास च्या तालुक्यातील अनेक महिलांची प्रसूती होत असते .परंतु सध्या कोविड -19 महामारी च्या पार्श्वभूमी वर आरोग्य व्यवस्थेवर तणाव आहे.
*समोर अनुभवावयास आलेल्या एक केस वरून कोरोना बाधित गर्भवती महिलांची स्वतंत्र प्रसूती कक्ष सोय करणे बाबत, क्रांती शौर्य सेनेच्या कल्याणी वाघमोडे यांनी निवेदन द्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडे मागणी केली .तसेच संपूर्ण महाराष्ट्रात अशी अडचण अनेक कोरोना बाधित गर्भवती महिलांना येत असते ,परंतू त्यांची गैरसोय होताना दिसत आहे. त्यामुळे या निवेदनाची प्रत महिला व बालविकास मंत्री अॅड . यशोमती ठाकूर , आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनाही मेलद्वारे निवेदन द्वारे मागणी करण्यात आली .*
दरम्यान अश्या काही केसेस पुढे येत आहेत .प्रसूतीपूर्वी कोविड चाचणी केल्यानंतर महिला कोरोना बाधित असेल तर त्यांची गैरसोय होत आहे.नातेवाईकांची धावाधाव होत आहे. खाजगी रुग्णालय मध्ये देखील
कोरोना बाधित महिलांची प्रसूती करण्यास ,प्रवेश देण्यास नकार देत आहेत .क्वचितच एखाद्या रुग्णालय मध्ये कोविड स्वतंत्र लेबर रूम ची सोय असते .परंतु त्याठिकाणी पोहचणे व लाखो रुपयांचे बिल भरणे ,दुर्बल घटकातील ,मध्यमवर्गीय कुटुंबातील महिलांना अशक्य असते .गेल्या वर्षभरा पासून कोविड ची परिस्थिती गंभीर असताना देखील अजून महिला शासकीय ग्रामीण रुग्णालय मध्ये स्वतंत्र कोविड प्रसूती कक्ष दिलेला नाही . तशी यंत्रणा उपलब्ध नाहीत ,अशी उत्तरे मिळत आहेत .तसेच ससून रुग्णालय ,पुणे येथे कोरोना बाधित महिलांना प्रसूती साठी पाठविण्यात येत आहे. या दरम्यान महिला व बालक यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो .याबाबत काही डॉक्टरांशी चर्चा देखिल केली. बारामती मध्ये सर्व सोयी सुविधा आहेत ,असे म्हटले जाते परंतु कोरोना बाधित महिला प्रसूती बाबतीत होणारी गैरसोय पाहून मात्र खंत वाटते ,अशी प्रतिक्रिया कल्याणी वाघमोडे यांनी दिली आहे.
संपूर्ण पुणे जिल्ह्यातील दुर्बल घटक ,व सामान्य कुटुंबातील अनेक कोरोना बाधित महिलांना वेळीच उपचार मिळणे ,गरजेचे आहे .सध्या तातडीने आरोग्य सेवा मिळणे देखील कठीण होत आहे .तसेच वेळेत रुग्णवाहिका मिळणे अवघड होत आहे .त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात प्रशासना ने गर्भवती कोरोना बाधित महिलांसाठी स्वतंत्र प्रसूती कक्षा ची सोय करावी ,जेणेकरून महिलांचा व नवजात बालकांचा जीव सुरक्षित राहील .त्यांची गैरसोय होता कामा नये ,अशी तातडीची मागणी कल्याणी वाघमोडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे .
×तालुका वैद्यकीय अधिकारी यांचे मत -*
बारामती शासकीय महिला ग्रामीण रुग्णालय येथे नॉन-कोविड महिलांची प्रसूती होते . कोविड पॉझिटिव्ह महिलांची प्रसूती करण्यासाठी रुग्णालय मध्ये स्वतंत्र यंत्रणा लागते. ती इथे उपलब्ध नसल्याने ससून रुग्णालय पुणे येथे सोय दिलेली आहे .असे रुग्ण रुग्णवाहिका मधून पुण्याला पाठविण्यात येतात. रुग्णांना गैरसोय होऊ दिली जात नाही -
डॉ.मनोज खोमणे ,तालुका वैद्यकीय अधिकारी
No comments:
Post a Comment