पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांचा सत्कार..सत्कर्म केलेल्या व्यक्तीचाच सत्कार होतो दिव्यांग व्यक्तीने केल्या भावना व्यक्त.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, April 2, 2021

पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांचा सत्कार..सत्कर्म केलेल्या व्यक्तीचाच सत्कार होतो दिव्यांग व्यक्तीने केल्या भावना व्यक्त..

पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांचा सत्कार..सत्कर्म केलेल्या व्यक्तीचाच सत्कार होतो दिव्यांग व्यक्तीने केल्या भावना व्यक्त..              

बारामती:-पोलिसांनी केलेल्या मदतीची जाणीव ठेवली दिव्यांग व्यक्तीने,याबाबत सविस्तर असे तालूक्यातील माळेगांव येथील दिव्यांग व सामाजिक कार्यकर्ते मधुकर वाईकर यांची दुचाकी वाहनाचे घेतलेले कर्जफेङ करण्यासाठी बारामती मधील पोलीस कर्मचारी , अधिकारी यांनी जी मोलाची मदत केली. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बारामती शहर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांचा दिव्यांग मधुकर वाईकर यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला.या अगळ्या वेगळ्या सत्कार समारंभाला बारामती तालूक्यातील अनेक मान्यवर हजेरी लावली.
माळेगाव कारखान्याचे माजी संचालक अशोक सस्ते,तसेच संघटनेचे रुपेश भोसले, कार्याध्यक्ष संजय अहीवळे, उपाध्यक्ष लक्ष्मण गायकवाड,
राजेंद्र पवार,अभिजित सोनवणे, यांच्या सह दिव्यांग मधुकर वाईकर यांनी नामदेव शिंदे यांना पुष्प व श्रीफळ देवून मनापासून आभार मानले.दिव्यांग व्यक्तीला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बारामती मधील पोलीसांनी केलेले सामाजिक कार्य मोलाचे आहे, अशी प्रतिक्रीया वाईकर यांनी व्यक्त केली.
ते म्हणाले ,सत्कर्म केलेल्या व्यक्तीचाच सत्कार होतो. अशी कृतज्ञता सुध्दा शेवटी मधुकर वाईकर यांनी व्यक्त करून आपल्या भावना व्यक्त केल्या.

No comments:

Post a Comment