बारामती शहर पोलीस स्टेशन हदीत हॉटेलमध्ये खंडणी मागणारे टोळीविरूध्द मोका अतंर्गत कारवाई
बारामती:-बारामती शहर पोलीस स्टेशन हृददीत दिंनाक ०७/०२/२०२१ रोजी रात्री ०८:३० वा.ते ०९:४५ वा. व दरम्यान यातील फिर्यादी हे त्यांचे स्नेहा गार्डन फलटण रोड बारामती ता. बारामती जि. पूणे या हाॉटेलवर असताना आरोपी
हे हॉटेलमध्ये येवून आरोपी क्र. १ नितीन बाळासो तांबे रा.पाहुणेवाडी ता.बारामती जि.पुणे हा फिर्यादीस 'मी एन टी भाई आहे. तु मला ओळखत नाहीस का? माझे पुण्यात भाई लोकांशी संवध आहेत. तुला हॉटेल निट चालवायचे असेल तर दर महीन्याला माझा माणुस येईल. त्याचेकडे २५ हजार रूपये दर महीन्याला दयायचे नाहीतर मी स्वतः एन. टी. भाई येईल लक्षात ठेव' असे म्हणून दमदाटी करून आरोपी क्र.२ अमिन दिलावर इनामदार बारामती जि. पुणे व अनोळखी तीन साथीदार हे फिर्यादीस म्हणाले की, एन.टी.भाईचे संबध लांब पर्यंत आहेत तु जर आमचेवर गुन्हा दाखल केला तर आम्ही जेलमध्ये बसु व जेलमधुन तुझा गेम करू' असे म्हणुन आरोपी क.१ यान हॉटेलच्या काऊंटरमधील कप्यातील मँगडॉल नंबर वन व्हिस्की च्या दोन कॉर्टर, मँगडॉल नंबर वन रमची एक कॉटर घेतली. त्याचेसोवत असणारे आरोपी क्र. २ याने फ़्रीजमधील किंग फिशर बियरच्या ४ बाटल्या जबरीने काढुन घेवून हॉटेलमधील टेबलावर जावुन पित बसले. रात्री ९:४५ वा. चे सुमारास आरोपींपैकी एक अनोळखी साथीदार याने फिर्यांदीजवळ येवून 'तुला असाच त्रास होईल. तु शहाना हो, एन टी भाईला त्याने सांगितल्याप्रमाणे दर महीन्याला २५ हजार रूपये हप्ता दे नाहीतर तुला असाच त्रास कायम होईल.' असे म्हणुन तो पुन्हा आरोपी क्र. १ याचेजवळ जावुन काहीतरी बोलला. त्यावर आरोपी क्र.१ याने फिर्यादीस 'तुला लय माज आलाय, मी आताच मोका तोडुन जेलमधुन बाहेर
आलेलो आहे. असे म्हणुन फिर्यादीस हाताने फाईट मारून खिशातुन चाकु काढुन हप्ता नाही दिला तर हॉटेल बाहेर आल्यावर तुझे तुकडे पाडु अशी धमकी दिली. आरोपी क. २ याने त्याचे हातातील पांढरे धातुच्या कडे हातात घेवून फि्यादीचे पोटात फाईट मारली त्यावेळी साक्षीदार हे सोडवण्यास येत असताना आरोपी व त्याचे तीन साथीदार यांनी फिर्यांदीस धक्काबुक्की करून आरोपींनी हॉटेलच्या काऊंटरमध्ये येवून ड्रावर उघडुन त्यामधील ७,२००/- रूपये रोख रक्कम, हॉँटेलचे लायसन्स एफ.एल.३-१६११, न्यु लिफ कंपनीचे घडयाळ असे जबरीने दरोडा टाकुन त्यांचेसोबत आणलेल्या दोन मोटार सायकलवरून फलटण बाजुकडे निघुन गेले आहेत. वगैरे मजकुरचे फिर्यादी वरून दाखल करणेत आलेला आहे.
यातील आरोपी नामे १) नितिन बाळासो तांबे २) अमिन दिलावर इनामदार ३) गणेश संजय बोडरे सर्व रा.बारामती ता. बारामती जि. पुणे व अनोळखी २ इसम यांचेवर बारामती शहर व परिसरात खुन, खुनाचा प्रयत्न,चोरी, दरोडा, खंडणी मागणी अशा स्वरूपाचे १३ गुन्हे संघटिपणे केल्याचे निष्पन्न झालेले आहेत. सदर आरोपी यांचेवर मोकांअतर्गत कारवाई होणेकामी मा. श्री. मनोज लोहीया सा, विशेष पोलीस महानिरीक्षक, परीक्षेत्र कोल्हापुर विभाग
यांचेकडे प्रस्ताव पाठविणेत आला होता. आरोपी यांनी केलेल्या गुन्हयाचे स्वरूप पाहता त्यांचेवर मोका अंतर्गत कारवाईकामी प्रस्ताव मंजुर करणेत आला आहे. सदर गुन्हयाचा तपास श्री. नारायण शिरगावकर, उपविभागीय पोलीस
अधिकारी, बारामती उपविभाग हे करीत आहेत.
सदरची कारवाई ही मा. डॉ. अभिनव देशमुख सो, पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण, श्री. मिलौंद मोहीते साो, अपर पोलीस अधिक्षक, बारामती विभाग बारामती, श्री. नारायण शिरगावकर सो, उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती
विभाग बारामती, बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. नामदेव शिंदे, सपोनि श्री. मुकुंद पालवे, पोलौस अंमलदार अविनाश दराडे, अतुल जाधव, अंकुश दळवी यांनी केलेली असुन सदर कारवाईवाबत मा. पोलीस अधिक्षक,पुणे ग्रामीण यांनी १५ हजार रूपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.श्री. नारायण शिरगावकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग यांनी बारामती उपविभागाचा पदभार स्विकारले पासुन १८ गुन्हेगारी टोळया विरूध्द १८ मोका अंतर्गत गुन्हे दाखल केले. त्यामध्ये १२० आरोपी अटक केले असुन टोळीप्रमुख व टोळी सदस्य यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
No comments:
Post a Comment