खंडणी गुन्ह्यातील फरार असलेला सराईत आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद
बारामती:- मा पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख सो यांचे आदेशावरून पाहिजे फरार आरोपी चा शोध घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोपनीय बातमी दारा मार्फत मिळालेल्या माहिती वरून आरोपी नामे श्रीराम उर्फ बापू जगन्नाथ माने, वय 32, रा. माळेगांव, ता. बारामती जि.पुणे यास माळेगांव येथे सापळा रचून पकडले असता तो मंचर पोलिस स्टेशन गु र नं ७३/२०२० भा द वी कलम ३९४, ३६४,३८५, ३४ या गुन्ह्यात १ वर्षा पासून फरार असल्याचे समजले पाहिजे फरार यादी क्र (२४९१) यावरून खात्री करून आरोपीस पुढील तपास कामी मंचर पोलिस स्टेशन च्या ताब्यात दिले आहे.
सदरची कारवाई ही मा पोलिस अधिक्षक श्री अभिनव देशमुख सो तसेच अप्पर पोलिस अधिक्षक श्री मिलिंद मोहिते यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट ,
पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननावरे पो हवा/रविराज कोकरे पो हवा/अनिल काळेपो ना/अभिजीत एकशिंगे पो ना/विजय कांचन
पो कॉ/धीरज जाधव यांनी केली आहे
No comments:
Post a Comment