फुले-आंबेडकर जयंती निमित्त उद्या बारामती महारक्तदान शिबीराचे आयोजन
बारामती दि.११: क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवा निमित्त उद्या सोमवार दि.१२ एप्रिल रोजी बारामतीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक या ठिकाणी सकाळी ९:३० ते ५ पर्यंत डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीने भव्य महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सध्या राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणावर रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे.त्यामुळे यंदाचा जयंती उत्सव विधायक पद्धतीने साजरा करत महाराष्ट्र अडचणीत असतानां आम्ही आमचं रक्त या देशासाठी आणि राज्यासाठी देऊन.'रक्तदान करुनी...महामानवांना अभिवादन करूया" या अभियाना अंतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन केले असल्याचे जयंती महोत्सव समितीच्या सदस्यांनी सांगितले.
दरम्यान,सर्वच स्तरातून या रक्तदान शिबिरासाठी उस्फुर्त प्रतिसाद मिळत असून बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी देखील आपण या शिबिरामध्ये सहभाग घेऊन रक्तदान करणार असून सर्व बारामतीकरांनी देखील रक्तदान करावे असं आवाहन केले आहे.
No comments:
Post a Comment