बारामती शहर पोलीस स्टेशन यांचेकडून तलवारी विक्री करणारा आरोपी जेरबंद
बारामती:-बारामती शहर पोलीस स्टेशन हददीत सहायक पोलीस उपनिरीक्षक एस आर निकम यांना यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, इसम नामे नितीन मल्हारी खोमणे रा.पिंपळी ता बारामती जि.पुणे हा त्याचेकडील यमाह कुक्स मोटार सायकल नंबर एम एच ४२ जी २८१६ हिचेवरून मौजे पिंपळी गावातुन बारामती शहरात स्टिल च्या तलवारी विक्िसाठी येणार आहे अशी गोपनीय बातमी मिळालेने सहायक
फौजदार एस आर निकम यांनी सदरची माहिती मा.पोलीस निरीक्षक श्री शिंदे सो,मा.स.पो. नि वाघमारे सो, यांना कळविलेवर मा.पोलीस निरीक्षक श्री.शिंदे सो यांनी स.पो.नी श्री वाघमारे सो यांना मिळालेने लागलीच बारामती शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे, सहायक फौजदार शिवाजी निकम,पा.काँ दशरथ इंगाले पा.का चव्हाण,पो.का शेख पो.का जाधव यांनी बातमीतील मिळाले माहीती प्रमाणे
मौजे बांदलवाडी केनॉल जवळ सापळा रचून शिताफिने पाठलाग करून इसम नामे नितीन मल्हारी खोमणे वय २५ वर्षे रा.पिंपळी ता बारामती जि.पुणे यास त्याचेकडील यमाह मोटार सायकलसह शिताफिने ताब्यात घेतले असता त्याचे गाडीला एका प्लास्टिकचे गोणीत २० स्टिलचे तलवारी लाकडी कव्हरसह मिळून आले
तसेच एक छरेचे लोखंडी पिस्टल ताब्यात घेतले सदर आरोपीस विश्वासात घेवून चौकशी केली असता त्याचेकडून समजले की सदर तलवारी विक्रीकरता आनेलेचे सांगितले सदर बाबत बारामती शहर पोलीस स्टेशन येथे भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५),मुबई पालीस कायदा कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल
करत आहोत.सदरची कामगिरी मा.पोलीस अधिक्षक सो श्री अभिनव देशमुख ,मा.अपर पोलीस अधिक्षक श्री.मिलींद मोहीते ,मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक श्री नामदेव शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे,सहायक फौजदार शिवजी निकम, पो.कॉ अकबर शेख पो.कॉ तुषार चव्हाण पो.कॉ दशरथ इंगोले पो.काँ अतुले जाधव होमगार्ड साळुके यांनी केली.
No comments:
Post a Comment