मनसेच्या वतीने अधिकारी यांना निवेदन, रुग्णांना औषधे व इंजेक्शन, ऑक्सिजन त्वरित उपलब्ध करून द्यावेत. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, April 24, 2021

मनसेच्या वतीने अधिकारी यांना निवेदन, रुग्णांना औषधे व इंजेक्शन, ऑक्सिजन त्वरित उपलब्ध करून द्यावेत.

मनसेच्या वतीने अधिकारी यांना निवेदन, रुग्णांना औषधे व इंजेक्शन, ऑक्सिजन त्वरित उपलब्ध करून द्यावेत.                                           बारामती:-सध्या देशात राज्यात व बारामतीमध्ये कोरोना साथीचा संसर्ग (कोव्हीड १९ )मोठया प्रमाणावर झालेला असून, बारामती शहरात दिवसात ४०० च्या आसपास कोव्हीड पॉझीटीव्ह रूग्ण सापडत आहेत. त्यामुळे बारामती येथील सर्व खाजगी रूग्णालये शासकीय रूग्णालये व कोव्हीड आयसोलेशन सेंटर्स येथे उपचार चालू आहेत. अंदाजे ३५०० रूग्णांवरती बारामती शहर व तालुक्यात उपचार चालू आहेत.अशा परिस्थितीमध्ये रूग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत. उपचारासाठी अत्यावश्यक
असणारी औषधे उदा.फेवीलो, फॅबीफ्ल्यू गोळया, रेमडिसीव्हर इंजेक्शन व ऑक्सीजन उपलब्ध होत नाही. त्यामुळे रूग्णांना प्राण गमवावे लागत आहे. तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पूढील गांभीर्यपुर्वक विचार करून तात्काळ अंमलबजावणी करणेत यावी. अन्यथा मनसेच्या
वतीने उग्र स्वरूपाची आंदोलने करण्यात येतील.
मागण्या करणेत येत असून, त्या मागणी पुढीलप्रमाणे
-१) शासकीय रूग्णालयांमध्ये कोरोना रूग्णांवर औषधोपचारासाठी अत्यावश्यक असणारी औषधे उदा. फेव्हीलो, फॅबीफ्लयू गोळया, रेमडिसीव्हर इंजेक्शन व ऑक्सीजन उपलब्ध करून दयावेत.
२) खाजगी रूग्णालयामध्ये औषधोपचार घेणारे कोरोना रूग्ण यांना हॉस्पीटल ने
केलेल्या मागणीनुसार रेमडिसीव्हर इंजेक्शन उपलब्ध करून दयावेत. ३) खाजगी रूग्णालयांमध्ये कोरोना रूग्णांवर उपचार करतेवेळी आकारण्यात येणारे बील व खर्च हे महाराष्ट्र शासनाचे ३१ ऑगस्ट २०२० चे मार्गदर्शाक परिपत्रकानुसार आकारण्यात यावे.
४) खाजगी रूग्णालयामध्ये उपचार घेणा-या कोरोना रूग्णांचे नातेवाईकांना Qबाहेरून रेमडिसीव्हर इंजेक्शन आणणेसाठी सक्ती व मागणी करणा-या रूग्णांलयांवर
व डॉक्टरांवर कार्यवाही करावी. बारामती शहर व तालुक्यात असणारे शासकीय व
खाजगी रूग्णालये यांचे स्ट्रक्चरल ऑडीट व ऑक्सीजन साठा करण्यासाठी असणारी
व्यवस्था यांचे ऑडीट व तपासणी करून घ्याव्यात.
५) शासकीय रूग्णालयामध्ये कोरोना रूग्णांची तपासणी करणेसाठी ( HRCT)
करणेसाठी CT Scan Machines तथा MRI Machines उपलब्ध करून दयावेत.जेणेकरून आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील रूग्णांना HRCT
रूग्णालयांवर अवलंबून रहावे लागणार नाही. कोरोना रूग्णांवर उपचार करताना कसुर व हलगर्जी करणा-या डॉक्टर व रूग्णालयांवर कठोर कारवाई करणेत यावी.
६) रेमडिसिव्हर इंजेक्शनचा काळा बाजार व बनावट इंजेक्शन तयार
करणा-यांवर करडी नजर ठेवून कठोर कार्यवाही करावी.
७) कोरोना संसर्गजन्य आजारावरती नियंत्रण आणणेकामी आयोजीत बैठकांमध्ये
सर्व पक्षांचे प्रमुख पदाधिकारी यांना विचारात घ्यावे.करणेसाठी खाजगी
प्रस्तुत मागण्यांवरती तात्काळ अंमलबजावणी करावी, अशी विनंती विनोद जावळे अध्यक्ष पुणे जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना व पदाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांना निवेदनाद्वारे केली आहे.

No comments:

Post a Comment