बारामतीत भंगार गोदामाला लागली आग - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, April 17, 2021

बारामतीत भंगार गोदामाला लागली आग

बारामती:-बारामती- फलटण रोड लगत शोरूम च्या मागे वस्तीवरील भंगाराच्या अनेक गोदामाला अचानक आग लागली. ही आग एवढि मोठी होती की धुराचे लोट पाहून लोकांच्यात भीती निर्माण झाली होती, ही आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाची वाहने त्याठिकाणी दाखल झाले आहेत. या आगीत जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, मात्र साठवून ठेवलेले भंगार आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे.प्रत्यक्षदर्शीनी
भंगाराच्या गोदामाला आज साडेदहा वाजन्याच्या दरम्यान अचानक आग लागली असल्याचे समजले. आगीचे लोट आसमंतात
उसळल्याने परिसरात घबराट पसरली. ही आग
विझवण्यासाठी बारामती नगरपालिकेची अग्निशमन दलाची वाहने त्या ठिकाणी दाखल झाली आहे,ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न अद्याप सुरू आहे.परंतु या आगीत या ठिकाणी साठवून ठेवलेले भंगार मोठ्या प्रमाणावर जळून खाक झाल्याची माहिती
 मिळत आहे. ही आग कशाने लागली याची  माहिती समजलेली नाही.

No comments:

Post a Comment