रिक्षा चालकांच्या वतीने राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत !
बारामती - (प्रतिनिधी) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या कडक निर्बंधाचा फटका मागील वर्षभरापासून रिक्षा चालकांना बसला आहे. संसर्गाची साखळी तोडण्यासाठी पुन्हा एकदा १५ दिवसांसाठी निर्बंध राहणार आहेत.
या निर्बंधामध्ये परवानाधारक ऑटो रिक्षाचालक महिन्याकाठी १५०० रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने बारामतीसह इंदापूर, दौंड येथील सर्व ऑटो रिक्षा चालकांच्या वतीने राज्य सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.
बारामतीतील राष्ट्रवादी ऑटो रिक्षा संघटनेचे अध्यक्ष दादा शिंदे म्हणाले, कोरोनाच्या या लोकडाऊन काळात रिक्षा व्यासायावर परिणाम झल्याने रिक्षाचालक हैराण झाले आहेत. या त्रस्त झालेल्या रिक्षा चालकांसाठी १५०० रुपयाचे अनुदान देण्याचा सरकारने चांगला निर्णय घेतला आहे.
बारामती प्रादेशिक परिवहन अंतर्गत बारामती, इंदापूर आणि दौंड या तिन्ही शहरातील परवानाधारक ऑटो रिक्षा चालकांची संख्या पंधराशे ते सोळाशेच्या घरात आहे. हा निधी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) माध्यमातून देण्यात यावा. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून दिलेला निधी अधिकृत व्यक्तीला मिळू शकणार आहे.
No comments:
Post a Comment